Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्लास्टिकला पर्याय’ म्हणत थाटात उद्घाटन; प्रत्यक्षात यंत्र बिघडलेले अन् दुर्लक्षित

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात बसवलेले ‘कापडी पिशवी वेंन्डिंग मशीन’ नागरिकांच्या फायद्याऐवजी सध्या त्रासाचे कारण ठरले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 20, 2025 | 02:56 PM
‘प्लास्टिकला पर्याय’ म्हणत थाटात उद्घाटन; प्रत्यक्षात यंत्र बिघडलेले अन् दुर्लक्षित

‘प्लास्टिकला पर्याय’ म्हणत थाटात उद्घाटन; प्रत्यक्षात यंत्र बिघडलेले अन् दुर्लक्षित

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/वैष्णवी सुळके : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात बसवलेले ‘कापडी पिशवी वेंन्डिंग मशीन’ नागरिकांच्या फायद्याऐवजी सध्या त्रासाचे कारण ठरले आहे. पर्यावरणपूरक उपक्रम म्हणत उद्घाटनाचा गाजावाजा झाला, पण प्रत्यक्षात यंत्र बंद, बिघडलेले आणि दुर्लक्षित आहे. या संदर्भात प्रशासन, संस्था आणि यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलताना दिसत आहेत.

या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आले. त्यांनी यावेळी म्हटले होते की, “गणपतीपासून जे काही सुरू होतं, ते निर्विघ्न पार पडतं,” अशी श्रद्धा ठेवून या पर्यावरणपूरक यंत्राचा शुभारंभ इथून केला जात आहे. ‘प्लास्टिकला पर्याय’ या घोषणेसह उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. मात्र दुसऱ्याच दिवशी हे यंत्र बंद पडल्याने श्रद्धा, नियोजन आणि व्यवस्थापन यांची तिहेरी परीक्षा लागली आहे.

याबाबत चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की, दुसर्‍या दिवशीच हे यंत्र बिघडल्याचे समजले. त्यानंतर हे सुरू केल्यानंतरही काही तासांमध्ये यामध्ये बिघाड झाला. जवळपास तीन ते चार वेळा यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. मात्र, त्यानंतर त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. सद्यस्थितीत ही मशीन पूर्णपणे बंद स्थितीत असून बर्‍याच दिवसांपासून याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

हे मशीन पैसे टाकल्यावर कापडी पिशवी देईल, अशी योजना आहे. यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जात आहे. मात्र, ही मशीन काम करत नसल्यामुळे अनेक भाविकांचे पैसे वाया जात आहेत. मशीनमध्ये पैसे टाकल्यानंतर यातून पिशवी येत नाही. याबाबत मशीनवर कोणतीही सूचना नाही, बिघाडाची माहिती दिलेली नाही. तसेच पिशव्यांचे यंत्र बसवल्यापासून त्यातून नेमकी किती पिशव्यांची विक्री झाली, याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच बंद झाल्यानंतर किती तक्रारी आल्या, किती नुकसान झाले, याबाबतची कोणतीही आकडेवारी नाही.

प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, अर्थात महाराष्ट्रातील विशेष अशा दगडूशेठ मंदिरात हे यंत्र बसवले, ही अतिशय उत्तम कल्पना आहे. मात्र, त्यामध्ये वारंवार बिघाड झाल्यानंतरही याची दखल न घेता जबाबदारी एकमेकांवर ढकलणे सुरू असल्याचे चित्र आहे.

जबाबदारी कुणाची? कोणतीच स्पष्टता नाही

या यंत्राचे व्यवस्थापन प्रशासनाकडे आहे की, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टकडे आहे, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. याबाबत काहींशी संपर्क साधला असता, प्रशासकीय अधिकारी म्हणतात, हे आमच्या अखत्यारित नाही. तर मंदिर ट्रस्टकडून उत्तर येते की, आम्ही केवळ ठिकाण उपलब्ध करून दिले असून काही बिघाड झाल्यास ते कळवण्याचे काम आम्ही करतो. मात्र, याबाबतचे सर्व अधिकार प्रशासनाकडे आहेत.

हे यंत्र बसवल्याच्या दुसर्‍याच दिवशी त्यात बिघाड झाला. त्यानंतर त्यात दुरुस्ती केल्यावरही काही तासांमध्येच ते पुन्हा बंद पडते. याबाबत भाविक व नागरिकांना कोणतीही कल्पना नसल्याने ते त्यात पैसे टाकतात आणि त्यातून पिशवीच बाहेर येत नाही.

– दगडूशेठ येथील फूलविक्रेते

या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, पैसे टाकल्यानंतर पिशवी न मिळण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकही हल्ली त्या यंत्राकडे पाठ फिरवत आहेत. त्याबाबत ते आम्हाला विचारणा करतात.

– दगडूशेठ येथील फूलविक्रेते

Web Title: The cloth bag vending machine in the dagdusheth halwai ganapati temple area has broken down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pankaja Munde
  • plastic bag
  • pune news

संबंधित बातम्या

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला
1

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला

Maratha Reservation : मराठा आंदोलनाची जोरदार तयारी; माळशिरस तालुक्यातून दीड हजार गाड्या मुंबईला जाणार
2

Maratha Reservation : मराठा आंदोलनाची जोरदार तयारी; माळशिरस तालुक्यातून दीड हजार गाड्या मुंबईला जाणार

पुण्यात वाहतूक होणार अधिक शिस्तबद्ध; RTO कडून घेण्यात आला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
3

पुण्यात वाहतूक होणार अधिक शिस्तबद्ध; RTO कडून घेण्यात आला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

ढोल ताशा पथकातील वादकांसाठी महत्वाची बातमी; शरीरावरील ताण कमी करण्यासाठी पाळा ‘या’ गोष्टी
4

ढोल ताशा पथकातील वादकांसाठी महत्वाची बातमी; शरीरावरील ताण कमी करण्यासाठी पाळा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.