Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sushilkumar Shinde : ‘मी काँग्रेसमध्येच राहणार’; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुशीलकुमार शिंदेंचं उत्तर

Sushilkumar Shinde : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पाहारिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावल्याची चर्चा सुरू झाली.

  • By विवेक
Updated On: Oct 23, 2026 | 06:49 PM
Sushilkumar Shinde

Sushilkumar Shinde

Follow Us
Follow Us:
  • शिखर पाहारियाच्या मोदी बॅनरवर सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया
  • ‘मी काँग्रेसमध्येच राहणार’; शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
  • भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांच्या परिस्थितीवर भाष्य
 

राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात धामधूम पाहायला मिळत आहे. अश्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे भाजपप्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या होत्या. शिंदेंचे नातू शिखर पहारिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर लावल्याने याबाबत चर्चा सुरु झाली. आता खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Sushilkumar Shinde)

नातवाच्या कृतीचं समर्थन करताना त्यांनी राजकारण आणि वैयक्तिक संबंध याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच ‘मी काँग्रेसमध्येच राहणार आहे,’ असे म्हणत त्यांनी भाजपप्रवेशाच्या चर्चाना पूर्णविराम लावला आहे.

काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे?

शिखर पाहारिया यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले म्हणून एवढं काय बिघडलं, असा सवाल शिंदे यांनी केला. आपणही नुकतीच पंतप्रधानांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एखाद्या नेत्याला शुभेच्छा दिल्याने किंवा त्याची भेट घेतल्याने आपली राजकीय विचारधारा बदलत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. राजकारणात प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ काढण्यापेक्षा त्याकडे समजूतदारपणे पाहायला हवं, असा संदेशही त्यांच्या वक्तव्यातून मिळतो.

Raj Thackeray : ‘हा लोकशाहीवरचा बलात्कारच!’ 500 कोटींच्या क्लिपवरून राज ठाकरे संतापले, ‘फ्रेंडशिप फाईल’वरून सरकारला घेरलं

‘भाजपमध्ये या’ असं मलाही सांगितलं!

भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत आपल्यालाही अनेकदा विचारणा झाल्याचा खुलासा सुशीलकुमार शिंदे यांनी केला. मात्र, आपण काँग्रेसमध्ये आहोत आणि तिथेच काम करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपमध्ये नव्याने गेलेल्या काही नेत्यांची परिस्थितीही आपण पाहिली असल्याचं ते म्हणाले. सुमारे 25 वर्षांपूर्वीही अनेक नेत्यांनी पक्ष सोडले होते आणि त्यातील काही जण काही वर्षांनी परतले, असं त्यांनी नमूद केलं.

मोदी आणि शरद पवारांच्या भेटींवरही भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याशी जितकं बोलतात, तितकंच शरद पवार यांच्याशीही बोलतात, असं शिंदे म्हणाले. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी किंवा एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावरून लगेच वेगळे अर्थ काढू नयेत, अशी त्यांची भूमिका दिसून आली.

मोदींकडून काही चांगल्या गोष्टी होतात, तर काही निर्णयांवर टीकाही होते. या सगळ्याचं विश्लेषण पत्रकारांनी केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

राजकारणापलीकडे अभ्यासालाही महत्त्व

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पुस्तक वाचल्याचं आणि कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासाबद्दलही माहिती घेतल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राजकीय शास्त्राचा विद्यार्थी म्हणून वेगवेगळ्या विचारधारा समजून घेणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. एकूणच, नातवाच्या बॅनरवरून सुरू झालेल्या चर्चेच्या निमित्ताने शिंदे यांनी काँग्रेसमधील आपली भूमिका आणि इतर पक्षांबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे.

Manoj Jarange React on Ramdas Kadam: क्लिप कशी व्हायरल झाली हे फडणवीसांना विचारा!; रामदास कदमांवर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार

Web Title: Sushilkumar shinde statement on bjp entry vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Sushilkumar shinde

संबंधित बातम्या

Manoj Jarange React on Ramdas Kadam: क्लिप कशी व्हायरल झाली हे फडणवीसांना विचारा!; रामदास कदमांवर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार
1

Manoj Jarange React on Ramdas Kadam: क्लिप कशी व्हायरल झाली हे फडणवीसांना विचारा!; रामदास कदमांवर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार

Ramdas Kadam Targets BJP: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप
2

Ramdas Kadam Targets BJP: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप

SIR Voter List: नालासोपारा मतदार यादीतून ३ लाख नावे वगळली? SIR च्या आकडेवारीवरून भाजपवर गंभीर आरोप
3

SIR Voter List: नालासोपारा मतदार यादीतून ३ लाख नावे वगळली? SIR च्या आकडेवारीवरून भाजपवर गंभीर आरोप

Supriya Sule Alligations on BJP: भाजपकडून पैसे वाटपासाठी ‘स्पायकॅम’ पेनचा वापर!; सुप्रिया सुळेंचा सनसनाटी आरोप
4

Supriya Sule Alligations on BJP: भाजपकडून पैसे वाटपासाठी ‘स्पायकॅम’ पेनचा वापर!; सुप्रिया सुळेंचा सनसनाटी आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.