Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहोळमध्ये श्री नागनाथ महाराज यात्रेदरम्यान पेहरावावरून वाद; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिरवणूक शांततेत

मोहोळ येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेदरम्यान पेहरावाच्या कारणावरून दोन गटांत झालेला वाद पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मिटवला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 23, 2026 | 01:16 PM
मोहोळमध्ये श्री नागनाथ महाराज यात्रेदरम्यान पेहरावावरून वाद; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिरवणूक शांततेत

मोहोळमध्ये श्री नागनाथ महाराज यात्रेदरम्यान पेहरावावरून वाद; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिरवणूक शांततेत

Follow Us
Follow Us:
  • मोहोळमध्ये श्री नागनाथ महाराज यात्रेदरम्यान वाद
  • पेहरावावरुन वाद झाल्याची माहिती
  • पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिरवणूक शांततेत
मोहोळ : ​सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मोहोळ येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेदरम्यान पेहरावाच्या कारणावरून दोन गटांत झालेला वाद पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मिटवला. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, पालखी मिरवणूक शांततेत पार पडली. सध्या शहरात शांतता असून, चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २२ एप्रिल रोजी रात्री ९:१५ च्या सुमारास श्री खर्गे महाराज मिरवणुकीसाठी आले असता, त्यांनी भगवा फेटा आणि भगवी कफनी परिधान केली होती. या पेहरावावर इतर मानकरी आणि काही तरुणांनी आक्षेप घेतला. ‘केवळ पांढरा फेटा आणि पांढरा गणवेश’ असावा या आग्रहावरून दोन्ही गटांत शाब्दिक चकमक उडाली.

​या वादामुळे मिरवणूक निघण्यास उशीर झाला. पालखी सोहळ्यासाठी जमलेले सुमारे ४ ते ५ हजार भाविक या अचानक उद्भवलेल्या गोंधळामुळे काही काळ घाबरले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून मोहोळ पोलिसांनी तातडीने दोन्ही बाजूंना शांत केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांशी सविस्तर चर्चा केली. अखेर, सर्वानुमते खर्गे महाराज यांनी पांढरा गणवेश परिधान करण्याचे मान्य केले आणि वादावर पडदा पडला.

वाद मिटल्यानंतर नागनाथ महाराजांची मिरवणूक उत्साहात सुरू झाली. आकर्षक अशा शोभेच्या दारूकाम कार्यक्रमानंतर मिरवणूक शांततेत संपन्न झाली. ​यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलिसांनी आधीच खबरदारी म्हणून नागनाथ महाराज ट्रस्टच्या १५ सदस्यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या होत्या.

हे सुद्धा वाचा : सायबर भामट्यांचे धाबे दणाणले! 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी टोळीवर ‘मकोका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

​”मानपमानाच्या किरकोळ गोष्टी विसरून जाऊन यात्रेचा आनंद घ्या. सध्या मोहोळ शहरात पूर्णपणे शांतता आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, शहरात पुरेशा प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.” -बाजीराव पोवार पोलीस निरीक्षक, मोहोळ

हे सुद्धा वाचा : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किती मतांनी निवडून होणार? रोहित पवार म्हणाले…

Web Title: The dispute that occurred during the shri nagnath maharaj yatra in mohol has been resolved after police mediation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Mahartashtra
  • Police News
  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur Crime: पतीच्या छळाला कंटाळली; 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून आई थेट मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात
1

Solapur Crime: पतीच्या छळाला कंटाळली; 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून आई थेट मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात

‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
2

‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा
3

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा

Solapur News : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या माऊलींचा पालखी सोहळा आज जिल्ह्यात! जिल्हा प्रशासन सज्ज; वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा
4

Solapur News : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या माऊलींचा पालखी सोहळा आज जिल्ह्यात! जिल्हा प्रशासन सज्ज; वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.