Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकशाहीर अण्णा भाऊंच्या विचाराने समाजवादी भारताचे स्वप्न साकार होईल : सुशीलकुमार शिंदे

लोकशाहीर अण्णा भाऊंनी ज्या कादंबऱ्या लिहल्या त्या कादंबऱ्यात स्त्रियांविषयी दर्जात्मक लिखाण केले आहे. वाटेगाव ते मुंबई हा अण्णांचा प्रवास थक्क करणारा आहे. गव्हाणकर, अमर शेख आणि अण्णा भाऊ ही त्रिसूत्रीचे महाराष्ट्रासाठी योगदान महत्वाचे आहे. वैराटांचे झोपडपट्टी धारकांसाठी केलेले कार्य मोलाचे आहे. असं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 18, 2022 | 03:48 PM
लोकशाहीर अण्णा भाऊंच्या विचाराने समाजवादी भारताचे स्वप्न साकार होईल : सुशीलकुमार शिंदे
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल व झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्ताने परिसंवाद व पुरस्कारर्थींचे सन्मान एस एम जोशी सभागृह पुणे येथे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी सुशीलकुमार शिंदे ( मा. केंद्रीय गृहमंत्री), रुपाली चाकणकर (महिला आयोग अध्यक्षा महाराष्ट्र), कुमार, सप्तर्षी (विचारवंत), आचार्य रत्नलाल सोनाग्रा (विचारवंत), भगवानराव वैराट, (अध्यक्ष झोसुद) डॉ. बजरंग कोरडे, (विचारवंत) असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे”भूषण पुरस्काराने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मिंलीद गायकवाड, बेटी बचाव बेटी पढाव ट्रस्ट अध्यक्षा गुरूमित कौर, बांधकाम व्यावसायिक किशोर ठक्कर, चित्रपट निर्माते डाॅ.अनिरबन सरकार, आरोग्य सेवा मंडळ, उपसंचालक डॉ.संजोग कदम, सर्वोपचार ससून रुग्णालय अधिष्ठाता डॉ.विनायक काळे इत्यादींना” शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊंनी ज्या कादंबऱ्या लिहल्या त्या कादंबऱ्यात स्त्रियांविषयी दर्जात्मक लिखाण केले आहे. वाटेगाव ते मुंबई हा अण्णांचा प्रवास थक्क करणारा आहे. गव्हाणकर, अमर शेख आणि अण्णा भाऊ ही त्रिसूत्रीचे महाराष्ट्रासाठी योगदान महत्वाचे आहे. वैराटांचे झोपडपट्टी धारकांसाठी केलेले कार्य मोलाचे आहे.

कुमार सप्तर्षी म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे समाजवादी भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी समाजात एकजुट महत्वाची आहे. त्यांच्या लेखनातून समाजाचे त्यांनी वास्तववादी जीवन मांडले आहे. साहित्यातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, समाजाला योग्य दिशा देण्यासाठी अण्णा भाऊंच्या विचारांची देवाणघेवाण होणे ही काळाची गरज आहे. अण्णा भाऊंनी समाजाला दर्जेदार साहित्य दिले. झोपलेल्या समाजाला जागे करण्यासाठी अशा परिसंवादांचे वेळोवेळी आयोजन होणे काळाची गरज आहे.

भगवानराव वैराट म्हणले की, अण्णा भाऊंना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं. अण्णांचे साहित्य समाजाला दिशा देणारे आहे. पुरोगामी विचारांसोबत मी सदैव असून आपण सगळ्यांनी हा विचार अंमलात आणला पाहिजे.

[read_also content=”पिंपरी-चिंचवड शहरात पावसामुळे रस्त्यांची चाळण; अनेक ठिकाणी अर्धवट बुजवलेत खड्डे https://www.navarashtra.com/maharashtra/in-pimpri-chinchwad-city-roads-are-washed-away-due-to-rain-partially-buried-pits-in-many-places-nrdm-305494.html”]

यावेळी सुलक्षणा धर शिलवंत, अँड राहिल मल्लिक ह्यांच्या उपस्थितीत “अण्णा भाऊ साठे” जीवनावर विचार मांडण्यात आले. गणेश लांडगे, महमद शेख, चंद्रशेखर पिवळे, आबा शिंदे, संतोष कदम, सुरेखा भालेराव, संतोष बोथाळजी, दत्ता डाडर, दत्ता कांबळे, संतोष पिल्ले, सुनील भिसे, हरिभाऊ माने, संतोष सोनवणे, प्रशांत नेटके आदींनी कार्यक्रसाठी श्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. तर आभार काशिनाथ गायकवाड यांनी मानले.

Web Title: The dream of socialist india will come true with the thinking of democrats anna bhau sushilkumar shinde nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 03:48 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • pune news
  • rupali chakankar
  • Sushilkumar shinde

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
2

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष
4

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.