Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Local Body Election : धाराशिव नगरपालिका निवडणुक प्रचारात नवरदेव मल्हार पाटलांच्या सहभागाने वाढला उत्साह

Maharashtra Local Body Election News : भाजपाचे जिल्ह्यातील युवा नेते मल्हार पाटील यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचाराची धुरा स्वतःहून सांभाळली असून भाजपाच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 25, 2025 | 03:17 PM
धाराशिव नगरपालिका निवडणुक प्रचारात नवरदेव मल्हार पाटलांच्या सहभागाने वाढला उत्साह

धाराशिव नगरपालिका निवडणुक प्रचारात नवरदेव मल्हार पाटलांच्या सहभागाने वाढला उत्साह

Follow Us
Close
Follow Us:
  • मल्हार पाटील यांच्याकडे भाजपा उमेदवारांच्या प्रचाराची धुरा
  • दोन दिवसांपूर्वी त्यांचा विवाह झाला
  • भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नेहा राहुल काकडे
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : भाजपाचे जिल्ह्यातील युवा नेते मल्हार पाटील यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचाराची धुरा स्वतःहून सांभाळली असून भाजपाच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले आहेत. दोन दिवसांपूर्वी शनिवारी (२२ नोव्हेंबर) त्यांचा विवाह झाला आहे. त्यांच्या अंगावरील हळदही अद्याप निघालेली नाही. मात्र शहराच्या विकासासाठी आपल्या खाजगी आयुष्यापेक्षा आपले कर्तव्य मोठे आहे ही खूणगाठ बांधून त्यांनी नगरपालिका निवडणुकांच्या प्रचार मैदानात उडी घेतली आहे. त्यास प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

BMC and TMC News – खड्ड्यांच्या मृत्यूंची जबाबदारी झटकली-न्यायालयाने मुंबई, ठाणे महानगरपालिकेला फटकारले

भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नेहा राहुल काकडे यांच्यासह प्रभाग क्रमांक १३चे उमेदवार सतीश कदम आणि वैशाली रवी मुंढे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (२४ नोव्हेंबर) संध्याकाळी प्रचार फेरी काढण्यात आली होती. प्रभागातील सर्व मुख्यरस्त्यांनी ही फेरी मार्गस्थ झाली. मार्गावरील व्यापाऱ्यांना अभिवादन करत, गाठीभेटी घेत, शहर विकासासाठी भाजपाला साथ देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रभागातील ठिकठिकाणच्या मंदिरात देवांना नमस्कार करून आशीर्वाद घेण्यात आले. अगदी दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले डॉ. पद्मसिंह पाटलांचे नातू मल्हार पाटील स्वतः प्रचार मैदानात उतरल्याने औत्सुक्य आणि कुतूहलाने या प्रचार फेरीस प्रभागातील नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत होते.

या वेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह शहरातील व प्रभागातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीला प्रभागातील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. वातावरण जयघोषाने आणि विजयी निर्धाराने दणाणून गेले होते. धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी ‘कमळ’ चिन्हावर बटण दाबा. असे आवाहन यावेळी करण्यात आले.

दरम्यान, धाराशिव नगरपालिका निवडणुकीत सुरूवातीपासून भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्रितपणे निवडणुक लढवणार होते. या संदर्भात दोन्ही पक्षांमध्ये तशा चर्चा देखील झाल्या होत्या. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमच्याशी युती करू आम्हाला 17 जागा देण्याचं कबूलही केलं होतं. त्याचबरोबर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देखील दिला होता. मात्र आता भाजपने अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 17 उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्याऐवजी आमच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत, असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुरुज साळुंखे यांनी केला आहे. या घटनेने शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत मोठा दगाफटका झाला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा ४ लाख २१ हजार मतदार वाढले, प्रारूप मतदारयादी जाहीर

Web Title: The election campaign of dharashiv municipality gained momentum with the participation of groom malhar patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Maharashtra Local Body Election: धाराशिव नगरपालिका निवडणुकीत ‘तुतारी’च्या परवीन कुरेशी ठरणार गेमचेंजर?
1

Maharashtra Local Body Election: धाराशिव नगरपालिका निवडणुकीत ‘तुतारी’च्या परवीन कुरेशी ठरणार गेमचेंजर?

ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट; शरद पवार गटात दुफळी तर ठाकरे गटात…
2

ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट; शरद पवार गटात दुफळी तर ठाकरे गटात…

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर उमेदवाराचे आकस्मिक निधन
3

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर उमेदवाराचे आकस्मिक निधन

Local Body Election: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीबाबत महत्वाची अपडेट; ‘ही’ यादी जाहीर होणार
4

Local Body Election: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीबाबत महत्वाची अपडेट; ‘ही’ यादी जाहीर होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.