
ऐन दिवाळीत महापालिकेची जप्ती कारवाई;
येत्या निवडणुकीतही २०१७ प्रमाणेच चार-सदस्यीय पद्धतीने ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवक असतील. महापालिकेने २२ ऑगस्ट रोजी ही प्रारूप रचना प्रसिद्ध केली होती. या रचनेवर १४ दिवस हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी सर्व हरकतींवर एकाच दिवशी सुनावणी घेण्यात आली.
व्याप्ती व वर्णनातील बदल
प्रभाग १० : अण्णासाहेब मगरनगर, टिपू सुलतान नगर आणि बीएसएनएल एमआयडीसी ऑफिस परिसर हे भाग आधीच या प्रभागात होते; मात्र व्याप्तीत नावांचा उल्लेख राहिला नव्हता. आता तो समाविष्ट करण्यात आला आहे.
प्रभाग ११ : भिमशक्तीनगरचा समावेश व्याप्तीमध्ये नव्हता; अंतिम रचनेत तो समाविष्ट केला गेला आहे.
प्रभाग २६ : वाकडचा उल्लेख व्याप्तीत नव्हता; तो आता अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आला आहे.
हद्दीतील अंशतः बदल:
प्रभाग १ आणि १२ : ताम्हाणे वस्तीचा भाग आता प्रभाग १२ मध्ये समाविष्ट.
प्रभाग ६ आणि ७ : गावजत्रा मैदान आणि महापालिका रुग्णालयाचा भाग प्रभाग ७ मध्ये समाविष्ट.
प्रभाग २४ आणि २५ : म्हातोबा वस्तीचा भाग प्रभाग २५ मध्ये जोडला.
हरकतींवर मर्यादित प्रतिसाद
सुमारे तीस लाख लोकसंख्येच्या शहरात केवळ ३१८ हरकती दाखल झाल्या. त्यापैकी बहुतेक समान स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे चार तासांतच सुनावणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही उदासीनता नागरिक आणि स्थानिक राजकीय गटांच्या कमी सहभागाचे द्योतक असल्याचे निरीक्षण व्यक्त होत आहे.
निवडणुकीचा पुढचा टप्पा सुरू होणार
या मंजुरीनंतर मनपा निवडणुकीची तयारी प्रशासनाने गतीने सुरू केली आहे. आता प्रभाग आरक्षणाची सोडत व मतदार यादी पुनरावलोकनानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या जानेवारी २०२६ मध्ये निवडणूक होण्याची अपेक्षा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाने दिलेली मान्यता ही निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. किरकोळ बदलांखेरीज रचना जवळपास तशीच कायम राहिल्याने निवडणुकीच्या मैदानात आता राजकीय समीकरणे ठरविण्याची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू होणार आहे.