The first reaction of the victim's father in the Vishal Gawli suicide case Kalyan Crime
कल्याण : कल्याणमध्ये 13 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला होता. यामधील आरोपी विशाल गवळी याने आत्महत्या केली आहे. नराधम आरोपीने चिमुरडीची हत्या देखील केली होती. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याची रवानगी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. कारागृहामध्ये आत्महत्या करुन त्याने जीव दिला आहे. या प्रकरणावर आता पीडित मुलीच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पीडितेच्या वडिलांनी याप्रकरणी एक मोठी मागणी पोलीस आणि राज्य सरकारकडे केली आहे.
विशाल गवळी तळोजा कारागृहात होता. तळोजा कारागृहात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याने शौचालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतला असून यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली. तुरुंग प्रशासन या घटनेने खडबडून जागे झाले. विशाल गवळी हा कल्याणमधील कुप्रसिद्ध गुंड होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न, छेड काढणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण असे गुन्हे दाखल होते. आता त्याने आत्महत्या केल्यामुळे पीडित मुलीच्या पालकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या आत्महत्येबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला देवाकडे न्याय मिळाल्याची पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली. विशाल गवळीच्या दोन भावांना देखील कठोर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांकडे त्यांनी या दोघांवर कारवाईची करावी. हे दोघे परिसरात दहशत निर्माण करत असून आम्हाला त्यांची भीती वाटत आहे, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. पीडित कुटुंबाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. आम्हाला देवाकडे मिळालेला हा न्यायच आहे, अशा भावना पीडित मुलीच्या वडिलांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विशाल गवळी हा कल्याणमध्ये सराईत गुंड होता. या प्रकरणापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न, छेडछाड काढणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण असे गुन्हे त्याच्यावर होते. त्याने तीन लग्न केली असून दोन बायकांनी सोडून दिल्यानंतर त्याने तिसरे लग्न केले होते. २३ डिसेंबर २०२४ रोजी कल्याणमधील कोळसेवाडी भागात राहणाऱ्या एका चिमुकल्या मुलीला फसवून त्याच्या घरी नेले आणि त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतरही तो दोन दिवस लपून राहिला, ओळख लपवण्यासाठी त्याने दाढीही काढली. पण अखेर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले होते.
Kalyan | आम्हाला न्याय मिळाला, विशाल गवळीला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळाली – पीडित मुलीचे वडील#Kalyan #VishalGawali #Crime #MarathiNews pic.twitter.com/SNfRAy7Iww
— Navarashtra (@navarashtra) April 13, 2025