Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाण्यात आज पहिले विद्यार्थी पक्षी संमेलन! चिमण्यांसाठी पाणी व दाण्याची व्यवस्था

पर्यावरण संवर्धन व पक्षी संरक्षणाविषयी जागृतीसाठी बुलढाण्यात आज पहिले विद्यार्थी पक्षी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 01, 2026 | 03:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

पर्यावरण संवर्धन आणि पक्षी संरक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरात आज, रविवार (दि. १) रोजी पहिले विद्यार्थी पक्षी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आयोजन बुलढाणा व अकोला वनविभाग, निसर्ग कट्टा अकोला तसेच मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटी, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणे, पक्ष्यांविषयी प्रेम निर्माण करणे आणि भविष्यातील पर्यावरण रक्षणासाठी सजग पिढी घडवणे, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.

Maharashtra Politics: “… मन अक्षरशः भरून येतंय

या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्षपदाची निवड ही पूर्णपणे विद्यार्थ्यांमधून आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. पर्यावरण विषयावर घेण्यात आलेल्या विशेष स्पर्धेत विजेती ठरलेल्या सईशा स्वप्नील काळवाघे हिची या पहिल्या विद्यार्थी पक्षी संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनाच नेतृत्वाची संधी देण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संमेलनाच्या निमित्ताने मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने दोन विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पक्षीमित्र कृतज्ञता पुरस्कार सुंदरखेड येथील राहुल हरी चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. आज चिमण्यांचे दर्शन दुर्मिळ होत असताना राहुल चव्हाण यांनी आपल्या घराच्या परिसरात अनेक चिमण्यांना निवारा उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी चिमण्यांसाठी पाणी व दाण्याची व्यवस्था केली असून, त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आजही त्यांच्या घराभोवती असंख्य चिमण्या पाहायला मिळतात. स्वतःच्या समाधानासाठी केलेल्या या पर्यावरणपूरक कार्याची दखल घेत त्यांना हा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच, दीपस्तंभ पुरस्कार बाल पक्षीमित्र मल्हार विनायक हिंगणे याला जाहीर करण्यात आला आहे. अल्पवयातच मल्हारने पक्षी निरीक्षण, नोंद ठेवणे आणि विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. आपल्या कॉमिक्सच्या माध्यमातून तो पक्ष्यांविषयी जनजागृती करत आहे. भावी पिढीला निसर्ग वाचनाची गोडी लागावी, या उद्देशाने त्याला दीपस्तंभ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

या संमेलनाच्या निमित्ताने बुलढाण्यातील पक्षी अभ्यासक आणि निसर्गप्रेमींच्या कलाकृतींचे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. वाइल्ड लाइफ अभ्यासक सईशा काळवाधे, मल्हार हिंगणे, राहुल चव्हाण, फोटोग्राफर डॉ. गजेंद्र निकम यांनी टिपलेल्या विविध पक्ष्यांच्या छायाचित्रांचे तसेच डॉ. विनायक हिंगणे यांनी रेखाटलेल्या पक्षी चित्रांचे प्रदर्शन जांभरुण रोडवरील मयूर कुंज, निकम हॉस्पिटलजवळ रविवारी (दि. १) आणि सोमवारी (दि. २) भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शीला किरण पाटील यांच्या हस्ते होणार असून, प्रदर्शन सकाळी ११.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना संशय

या उपक्रमाबद्दल बुलढाणा वनविभागाच्या उपवनसंरक्षक सरोज गवस, मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. वैशाली गजेंद्र निकम तसेच निसर्ग कट्टा संस्थेचे संस्थापक अमोल सावंत यांनी संमेलनाच्या अध्यक्षा सईशा काळवाघे आणि सर्व पुरस्कार विजेत्यांचे विशेष कौतुक केले आहे. पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांचा हा पुढाकार प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The first student bird conference is being held in buldhana today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • buldhana news

संबंधित बातम्या

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट
1

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट

खडकपूर्णा प्रकल्पात ७ टक्केच जलसाठा; बुलढाणा जिल्ह्यात मोजक्याच प्रकल्पांतच पुरेसा साठा, पेयजल अन् सिंचनाची चिंता वाढली
2

खडकपूर्णा प्रकल्पात ७ टक्केच जलसाठा; बुलढाणा जिल्ह्यात मोजक्याच प्रकल्पांतच पुरेसा साठा, पेयजल अन् सिंचनाची चिंता वाढली

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
3

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

Buldhana: दुष्काळाच्या झळा, मदतीकडे डोळा; पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा
4

Buldhana: दुष्काळाच्या झळा, मदतीकडे डोळा; पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.