Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोळीवली येथे सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सोहळ्याला सुरुवात! यंदा २५ वे वर्ष

नेरळजवळील कोळीवली येथे सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सोहळ्याला मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली आहे. गेल्या २४ वर्षांपासून सुरू असलेल्या या सोहळ्याचे यंदा २५ वे वर्ष असून तो २८ ते ३१ जानेवारीदरम्यान होत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 28, 2026 | 07:16 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

नेरळ कोळीवली येथे सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सोहळ्याला मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली आहे. कर्जत तालुक्यातील नेरळजवळ असलेल्या कोळीवली गाव व परिसराच्या वतीने गेल्या २४ वर्षांपासून अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून, यंदा या उपक्रमाचे २५ वे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. श्री संत सेवा वारकरी संप्रदाय मंडळाच्या पुढाकाराने हा पवित्र सोहळा २८ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कोळीवली येथे संपन्न होत आहे.

Ajit Pawar Plane Crash: “तो आवाज कानात घुमतो आहे”, अपघातापूर्वी अजित पवारांनी शेवटचा फोन कुणाला केला होता?

या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात आज पहाटे काकड आरती व भजनाने झाली. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणास प्रारंभ करण्यात आला. कोळीवली गाव व परिसरातील वारकरी संप्रदायाच्या भक्तीमुळे हा सोहळा गेली अनेक वर्षे अखंडपणे सुरू असून, या माध्यमातून वारकरी परंपरा अधिक दृढ होत आहे. साडेतीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात प्रवचन, हरिकीर्तन, भजन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, काकड आरती, जागर भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्षीच्या सुवर्णमहोत्सवी हरिनाम सोहळ्यात नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे. ह.भ.प. महादेव महाराज शिंदे (देवाची आळंदी), ह.भ.प. जयश्रीताई घोरट (देहनोली, मुरबाड) आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज कोठुळे (बीड) यांची हरिकीर्तने होणार आहेत. तसेच काल्याचे कीर्तन ह.भ.प. कैलास महाराज भोईर यांच्या वतीने होणार आहे.

Ajit Pawar Death News: अजित पवारांचे विमान अपघातात निधन; पुण्यात दोन दिवसांची शासकीय सुट्टी जाहीर

अखंड हरिनाम सप्ताहाचा दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकड भजन, सकाळी ८ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १ ते २ संगीत भजन, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६.३० हरिपाठ, सायंकाळी ७ ते ८ संगीत भजन आणि रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन व त्यानंतर जागर भजन असा आखलेला आहे. हा सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सोहळा ह.भ.प. श्री कैलास महाराज भोईर यांच्या देखरेखीखाली पार पडत असून, पंढरीनाथ तांबोळी, बळीराम भागीत, विजय महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे व्यवस्थापन ह.भ.प. दिगंबर पंढरीनाथ तांबोळी (अध्यक्ष), प्रमोद परशुराम तांबोळी (सचिव), ह.भ.प. बळीराम भागीत (खजिनदार) तसेच व्यवस्थापक सदस्य व ग्रामस्थ मंडळ यांच्या सहकार्याने अविरतपणे सुरू आहे. कोळीवली परिसरात या हरिनाम सोहळ्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

Web Title: The golden jubilee continuous chanting of gods name ceremony has begun at koliwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • neral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.