Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

Neral Bandh: नेरळमध्ये सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नेरळ बंदचे आवाहन करण्यात आले असून बंदला सुरुवात झाली आहे. दरम्यान, उपोषणकर्त्याच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर कार्डिओलॉजिस्टकडून उपचार करण्यात यावेत, अशी शिफारस आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 01, 2026 | 12:14 PM
नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

Follow Us
Follow Us:
  • नेरळ बंदला सुरुवात
  • उपोषणकर्त्याला पाठिंबा देण्यासाठी नेरळ बंदचे आवाहन
  • कार्डीओलॉजिस्ट कडून उपोषणावर उपचार व्हावेत आरोग्य विभागाचे शिफारस
कर्जत: 28 सप्टेंबर पासून नेरळ गावातील प्रश्न समस्या मार्गी लावण्यासाठी मानवाधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनी उपोषण सुरू केले आहे.तीन दिवस उपोषण केल्यानंतर एकही मागणी मान्य झालेली नाही . त्यामुळे नेरळ ग्रामस्थांनी नेरळ बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले आहे. आम्ही नेरळकर ग्रुप कडून नेरळ बंदचे आवाहनानंतर आज सकाळ पासून बंद 100 टक्के यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान,उपोषणकर्ते यांनी गोरख शेप यांची प्रकृती लक्षात घेता इसिजी चाचणी करण्यात आली असून कार्डीओलॉजिस्ट कडून उपचार घेण्याची सूचना देण्यात आली आहे. (Neral Bandh)

नेरळ ग्रामपंचायत संबंधित आणि सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्यासंबंधीत विषय मार्गी लागावेत,नेरळ ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत अधिकारी, प्रशासक यांच्या कारभाराची चौकशी व्हावी,नेरळ नगरपरिषद व्हावी आदी मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांनी 28 सप्टेंबर पासून नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू केले आहे.तीन दिवसांच्या उपोषण काळात त्यांच्या 13 मागण्यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही.

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा

त्यानंतर आम्ही नेरळकर म्हणुन नेरळ बाजारपेठ बंद ठेवण्यात यावे असे आवाहन असंख्य तरुणांनी बाजारपेठ मध्ये फिरून केले. त्यानंतर उपोषणाच्या चौथ्या दिवशी नेरळ बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार आज सकाळ पासून नेरळ गावातील बाजारपेठ बंद दिसून आली.

नेरळ मधील व्यापाऱ्यांनी फेरीवाले आणि फुटपाथ वर बसून व्यवसाय करणारे या सर्वांनी आवाहनानुसार नेरळ बंद ठेवले आहे.या उपोषणचे निमित्ताने नेरळ बंद चे आवाहन करणारे कोणतेही पत्र पोलीस ठाणे यांच्याकडे दिले नसल्याची माहिती पोलीस ठाण्याकडून मिळत आहे. परंतु आपल्या गावातील प्रश्न सोडवण्यासाठी उपोषण सुरू असल्याने नेरळ बाजारपेठ बंद ठेवून पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान,मध्यरात्री नंतर उपोषणकर्ते शेप यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने शेवटी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी इसीजी काढून हृदयरोग रुग्ण असलेल्या उपसोहनकर्त्याची आरोग्य तपासणी केली.दुसरीकडे आरोग्य विभागाचे वतीने नेरळ पोलिस आणि प्रशासन यांनी बायपास शस्त्रक्रिया झालेले उपोषणकर्ते गोरख शेप यांच्यावर रुग्णालयात दाखल करून कार्डीओलॉजिस्ट यांच्या देखरेखीत उपचार व्हावेत अशी सूचना करण्यात आली आहे.त्यामुळे आज चौथ्या दिवसानंतर उपोषण कायम राहिल्यास प्रशासन उपोषणकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Anti-rabies awareness : रेबीजविरोधी जनजागृती; २ हजार माहितीपत्रकांचे वाटप, नेरळमधील विद्यार्थ्यांची सायकल रॅली

Web Title: Neral bandh called in support of hunger striker health department recommends cardiologist treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • maharashtra
  • neral
  • raigad

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
2

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
3

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
4

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.