Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीतील अदृश्य हात महाराष्ट्राला मागे खेचत आहेत ; खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप

दिल्लीमधील अदृष्य हात महाराष्ट्राला पुढे नेण्याऐवजी मागे खेचत आहे. मराठी माणूस त्यांना संपवायला आहे. सुसंस्कृत विचाराने पुढे जाणारे पुर्वीचे भाजपचे नेते आणि आत्ताच्या भाजप नेत्यांमध्ये पुर्णतः विरोधाभास जाणवत आहे.आत्ताचे भाजपवाले जुमलाबाज आहेत.

  • By Aparna
Updated On: Oct 08, 2023 | 02:08 PM
दिल्लीतील अदृश्य हात महाराष्ट्राला मागे खेचत आहेत ; खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

माळेगाव : दिल्लीमधील अदृष्य हात महाराष्ट्राला पुढे नेण्याऐवजी मागे खेचत आहे. मराठी माणूस त्यांना संपवायला आहे. सुसंस्कृत विचाराने पुढे जाणारे पुर्वीचे भाजपचे नेते आणि आत्ताच्या भाजप नेत्यांमध्ये पुर्णतः विरोधाभास जाणवत आहे.आत्ताचे भाजपवाले जुमलाबाज आहेत. त्यांना आगामी लोकसभेच्या निवडणूकीत जनता नाकारणार आहे. त्यामुळेच दिल्लीचे अदृष्य हात महाराष्ट्रासह अनेक राज्यात फोडाफोडीचे राजकारण करतात. त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष बळी पडला. परंतु आम्ही इंडियावाले या भाजपवाल्यांविरुद्ध लढणार आणि जिंकरणारही आहे, असा निर्धार खासदार सुप्रिया सुळे यांनी माळेगाव मध्ये बोलताना व्यक्त केला.

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी पक्षाची सुनावणी झाली, आदी विषयांच्या पार्श्वभूमिवर सुप्रिया सुळे यांनी माळेगाव (ता. बारामती) येथे पत्रकारांशी संवाद साधला. सुनावणी होण्याआगोदरच आम्हाला चिन्ह व पक्ष मिळणार असे आमच्यातून निघून गेलेले नेतेमंडळी बोलून दाखवितात. त्यामुळेच पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाने स्वतंत्रपणे सुप्रिम कार्टात आमच्यातून बाजूला गेलेल्यांविरुद्ध अपिल केले, या भूमिकेकडे लक्ष वेधत सुळे म्हणाल्या,“ भाजपची रणनिती संविधान टिकण्याच्यादृष्टीने धोकादायक आहे. भाजपचे नेते दिल्लीत एक आणि राज्यात एक अशी भूमिका घेत असल्यामुळे मराठा, धनगर, अन्य जातीमधील अरक्षणाचे मुद्दे मागे राहिले. महिला विधायक मंजूर करून महिलांना बेरर चेक दाखविला खरा, परंतु त्या चेकवर दिनांक टाकली नाही. त्यामुळे दिल्ली वगळता देशात कोठेही महिलांकडून या मंजूर विधायकाबाबत स्वागत अथवा जल्लोश झाला नाही. “ महाराष्ट्रात भावी महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते, परंतु या महिलांना सध्याला मोठ्या राजकिय आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे, असे विचारले असता सुळे म्हणाल्या,“ मुख्यमंत्रीपद हे महिला अथवा पुरूषांमध्ये कृतृत्वान माणसाला मिळते. हे जरी खरे असले तरी महिला म्हणून मी, मुंडेताई आपापल्या पक्षामध्ये खंबीरपणे काम करीत आहे. परंतु आम्हाला स्वतःच्या पक्षातूनच संघर्षाला सामोरे जावे लागते, हे दुर्दैवी आहे.“ कोवीड काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकाने लोकांचे आरोग्य सुरक्षिते ठेवण्यासाठी उत्तम काम केल्याचे देशातील जनताच बोलून दाखवते, असे सांगून सौ. सुळे म्हणाल्या,“ महाराष्ट्रामध्ये नांदेड, नागपूर, ठाणे, संभाजीनगर आदी ठिकाणी सरकारी हाॅस्पीटलमध्ये सुविधांचा अभाव, कामातील हालगर्जीपणा आणि सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने मोठी मनुष्यहानी झाली आहे. कच्चीबच्चीमुले डोळ्यादेखत मरण पावली. तेथील मातापालकांचे हाल पहावत नव्हते. याचा जाब सरकारला आगामी काळात द्यावा लागणार आहे.“

बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणार…
आपले बंधू अजितदादा आपल्याबरोबर नसल्याने बारामती लोकसभेची निवडणूक आव्हानात्मक आहे असे सौ. सुळे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या,“ बारामती लोकसभा मतदार संघात गेली १५ वर्षे प्रमाणिक काम केले. या मतदार संघाने मला संसदेमध्ये पाठविल्य़ानंतर इतके चांगले काम केले, की मला त्या संसदेने अनेकदा पुरस्काराने सन्मानिक केले. आजवर या मतदार संघात प्रत्येक आमदाराला विश्वासात घेऊन आणि प्रोटोकाल धरून काम केले. त्यामुळे लोकांमध्ये माझे विश्वासाचे नाते तयार झाले आहे. या मतदार संघातील शाळा, आरोग्य सुविधा, रस्ते, दिवाबत्तीची सुविधा, मंदीरांचा जिर्णोधार, आदी काम मार्गी लावली आहेत. यापुढील काळात पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुराव करणार आहे. या कामाच्या जोरावर बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणारही, असा निर्धार सुळे यांनी व्यक्त केला.

अमोल मिटकरेंना फटकारले…
अजित पवार यांच्यासारख्या भावाने तण, मन आणि धण दिल्यामुळे सुप्रियाताई तुम्ही राजकारणात यशस्वी झालात, असे आमदार अमोल मिटकरे यांनी वक्तव्य केले होते, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता सौ. सुळे म्हणाल्या,“राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी तण आणि मनाने निवडणूका लढवते आणि जिंकते. राहिला प्रश्न धणाचा. धण कोणाला दिले, हे पुन्हा एकदा त्यांनी विचार करून सांगावे. धणाने निवडणूका जिंकण्याची आणि सरकार पाडण्याची संस्कृती आमची नाही, तर तुम्ही ज्यांच्याबरोबर गेला त्यांची आहे.“ अशा शब्दात त्यांनी मिटकरेंना फटकारले.

Web Title: The invisible people in delhi are dragging maharashtra back allegation of mp supriya sule nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2023 | 02:01 PM

Topics:  

  • baramati
  • maharashtra
  • Malegaon
  • Pune
  • supriya sule

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
3

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
4

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.