Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

पडद्यामागील चर्चेनंतर दोन्ही गटांनी ‘एकजूट’ दाखवत पुन्हा हात मिळवला आहे. आरोप–प्रत्यारोपांना पूर्णविराम मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये सुटकेचा निःश्वास आणि नव्या जोमाचा उत्साह दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 18, 2025 | 07:20 PM
Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
Follow Us
Close
Follow Us:

नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत आला ट्विस्ट
अजित पवार आणि रंजनकुमार तावरे एकाच व्यासपीठावर
ऐतिहासिक मनोमिलनानं निवडणुकीच्या संपूर्ण समीकरणालाच कलाटणी

माळेगाव/प्रदीप जगदाळे: माळेगाव नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात अनपेक्षित वळण घेतलं आहे. तब्बल तीन दशके संघर्षात असणारे प्रदेशाचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे अखेर एकाच व्यासपीठावर आले आहेत. या ऐतिहासिक मनोमिलनानं माळेगाव निवडणुकीच्या संपूर्ण समीकरणालाच कलाटणी दिली आहे.गेल्या काही महिन्यांपासून तावरे–पवार गटातील मतभेद चव्हाट्यावर होते.

मात्र, पडद्यामागील चर्चेनंतर दोन्ही गटांनी ‘एकजूट’ दाखवत पुन्हा हात मिळवला आहे. आरोप–प्रत्यारोपांना पूर्णविराम मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये सुटकेचा निःश्वास आणि नव्या जोमाचा उत्साह दिसून येत आहे.निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मैदानात असताना या मनोमिलनानंतर राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. नगराध्यक्षपदाची लढत अधिकच रंगात आली असून मतदारसंघात नवे राजकीय गणित मांडले जात आहे.

वडगावात भाजप-शिवसेना युतीची मोठी घोषणा! १४ उमेदवारांची घोषणा अन् महिला शक्तीला बळ

माहितीनुसार, अजित पवार गटाला नगराध्यक्षपदातील १० जागा तर तावरे गटाला ८ जागांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही गटप्रमुख आता रणनिती आखण्यास सज्ज झाले आहेत. दुसरीकडे, विरोधी गटातील काही उमेदवारांनीही या घडामोडीनंतर आपली उमेदवारी पुनर्विचारात घेतल्याची चर्चा आहे.

Local Body Elections 2025: वडगाव नगरपंचायतीच्या निवडणूक उमेदवारांशिवाय? एकाही उमेदवाराने भरला नाही अर्ज

तीस–पस्तीस वर्षांचा राजकीय संघर्ष संपल्याने स्थानिक मतदार या बदलाला ऐतिहासिक क्षण म्हणून पाहत आहेत. “आज माळेगावच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली,” अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून उमटत आहेत.दरम्यान, फॉर्म भरण्यापासूनच प्रचारात वेग आला असून गावागावात प्रचारसभा आणि चर्चांचा धडाका सुरू आहे. पवार–तावरे यांच्या एकत्रित शक्तीसमोर विरोधकांची समीकरणे कोसळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.एकूणच, माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक आता राजकीय रंगात न्हाऊन निघाली असून पवार–तावरे यांच्या मनोमिलनामुळे या लढतीचं तापमान चांगलंच वाढलं आहे.

Web Title: Malegaon nagarpanchayat local body election ncp ajit pawar with ranjankumar tawre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Local Body Election
  • Malegaon

संबंधित बातम्या

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला
1

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश
2

Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश

Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप
3

Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप

मनपा निवडणुकीत युती फिसकटली, आघाडी जुळली; भाजपा, शिवसेना, काँग्रेसचे उमेदवार जाहीर
4

मनपा निवडणुकीत युती फिसकटली, आघाडी जुळली; भाजपा, शिवसेना, काँग्रेसचे उमेदवार जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.