Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: प्रदूषणमुक्तीची ‘मिठी’ फक्त कागदावरच! मुंबईकरांना सांडपाण्याचा त्रास, तर महानगरपालिकेच्या तिजोरीला २१ कोटींचा भुर्दंड

टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स आणि कर सल्लागारांच्या अभिप्रायाचा दाखला देत पालिकेने ही वाढ कंत्राटदाराला देण्याचे मान्यही केले. कंत्राटदाराला वाढीव पैसे मोजण्यात तत्परता दाखवणाऱ्या पालिकेने प्रत्यक्ष काम वेळेत पूर्ण करून घेण्याकडे मात्र दुर्लक्ष केल्याचा सूर उमटत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 08, 2026 | 11:40 AM
प्रदूषणमुक्तीची 'मिठी' फक्त कागदावरच! मुंबईकरांना सांडपाण्याचा त्रास, तर महानगरपालिकेच्या तिजोरीला २१ कोटींचा भुर्दंड

प्रदूषणमुक्तीची 'मिठी' फक्त कागदावरच! मुंबईकरांना सांडपाण्याचा त्रास, तर महानगरपालिकेच्या तिजोरीला २१ कोटींचा भुर्दंड

Follow Us
Follow Us:

मुंबईकरांना प्रदूषणमुक्त आरोग्यवर्धक वातावरण देण्याचे मुंबई महापालिकेचे दावे सध्या तरी कागदावरच असल्याचे चित्र असून, मुंबई मलनिःसारण प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत ‘मिठी पॅकेज ४’ बोगदा प्रकल्पाचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यात पालिकेला अपयश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यामुळे मुंबईकरांच्या करांमधून होणाऱ्या खर्चात मात्र तब्बल २१.०३ कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.(फोटो सौजन्य – AI)

सरकारने अखेर घोषणा केलीच ! ‘या’ वाहनांना नाही द्यावा लागणार आता टोल

केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराचा दर १२ टक्क्यांवरून १८ टक्के केल्याचे कारण पुढे करत हा वाढीव भार पालिकेच्या तिजोरीवर पडला असून, प्रकल्पाचा एकूण खर्च आता ६२५.३४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या सुधारित खर्चाला मंजुरी मिळवण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीकडे प्रस्ताव धाडण्यात आला असून, चालू आर्थिक वर्षात (२०२६-२७) या कामासाठी आणखी ३४ कोटी रुपयांची भांडवली तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.

मिठी नदी प्रत्यक्ष कधी होणार प्रदूषणमुक्त?

१३ जुलै २०२२ रोजी केंद्र सरकारने जीएसटी वाढवला, त्यानंतर कंत्राटदाराने ‘फिडिक येलो बुक’मधील कलमाचा आधार घेत पालिकेकडे अतिरिक्त पैशांची मागणी केली.टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स आणि कर सल्लागारांच्या अभिप्रायाचा दाखला देत पालिकेने ही वाढ कंत्राटदाराला देण्याचे मान्यही केले. कंत्राटदाराला वाढीव पैसे मोजण्यात तत्परता दाखवणाऱ्या पालिकेने प्रत्यक्ष काम वेळेत पूर्ण करून घेण्याकडे मात्र दुर्लक्ष केल्याचा सूर उमटत आहे.पालिकेच्या दाव्यानुसार, खर्च वाढला तरी कंत्राट कालावधी तोच राहील, तसेच भविष्यात जीएसटी कमी झाल्यास पैसे कमी केले जातील, अशी ‘कागदी’ तरतूदही प्रस्तावात आहे. मात्र प्रत्यक्ष मिठी नदी कधी प्रदूषणमुक्त होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.

ऑक्टोबर २०२१ मध्ये जेव्हा मे. जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स आणि मे. मिशिगन इंजिनिअर्स (जॉइंट व्हेंचर) यांना ६०४.३० कोटींचे कंत्राट देण्यात आले, तेव्हा पावसाळ्यासह ४ वर्षांत (म्हणजेच २०२५ पर्यंत) हे काम पूर्ण करणे बंधनकारक होते.पालिकेच्या नेहमीच्या संथ कारभारामुळे आधीच या प्रकल्पाला ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ द्यावी लागली होती. आता जुलै २०२६ उजाडला तरी ९६.६७ टक्के काम झाल्याचा दावा केला जात असून, उर्वरित कामासाठी पुन्हा एकदा नवीन मुदतवाढ देण्याची प्रक्रिया पडद्यामागे सुरू आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाहीच, 1 ऑगस्टपासून…

दरवर्षी पावसाळ्यात दूषित पाणी वाहते रस्त्यावर

बापट नाला आणि सफेद पूल नाला या भागातील सांडपाणी मिठी नदीत मिसळण्यापासून रोखण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. एल.बी.एस.रोडवरील सध्याची मलजल वाहिनी पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात हे दूषित पाणी रस्त्यावर पसरते आणि मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ होतो. २०५१ पर्यंतचा भविष्यातील १६८ दशलक्ष लीटर प्रवाहाचा विचार करून हे पाणी धारावी प्रक्रिया केंद्राकडे वळवण्याचे नियोजन होते, पण नियोजनाच्या अभावामुळे हा प्रकल्प अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The mithi cleanup exists only on paper mumbaikars suffer from sewage woes while the municipal corporations coffers take a 21 crore hit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Mithi River
  • Monsoon Alert
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईत मॅकडोनाल्डसह ३ ठिकाणांवर FDAची कारवाई; गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न परवाने निलंबित
1

मुंबईत मॅकडोनाल्डसह ३ ठिकाणांवर FDAची कारवाई; गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न परवाने निलंबित

Maharashtra Breaking News Today 2026:  NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर
2

Maharashtra Breaking News Today 2026: NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन
3

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन

चाळीतून थेट चॅम्पियनशिपपर्यंत! मुंबईच्या सात खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून कौतुक
4

चाळीतून थेट चॅम्पियनशिपपर्यंत! मुंबईच्या सात खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.