Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनपाची थकबाकी वाढता वाढता वाढे…, महिनाभरात ४५ कोटी आणण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

महापालिकेची मालमत्ताकर व पाणीपट्टीची थकबाकी २७५ कोटींवर पोहोचली आहे. मागील आर्थिक वर्षात भरघोस शास्तीमाफो देऊनही थकित आकडा वाढत चालला आहे. यावर्षी शास्तीमाफी मिळणार नसल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 13, 2025 | 04:05 PM
मनपाची थकबाकी वाढता वाढता वाढे..., महिनाभरात ४५ कोटी आणण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

मनपाची थकबाकी वाढता वाढता वाढे..., महिनाभरात ४५ कोटी आणण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

Follow Us
Close
Follow Us:
  • महापालिकेची मालमत्ताकर व पाणीपट्टीची थकबाकी २७५ कोटींवर
  • चार प्रभाग कार्यालयांना ४५ कोटींचे उद्दीष्ट
  • पूर्तता न झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला

अहिल्यानगर शहर वार्ताहर महापालिकेची मालमत्ताकर व पाणीपट्टीची थकबाकी २७५ कोटींवर पोहोचली आहे. मागील आर्थिक वर्षात भरघोस शास्तीमाफो देऊनही थकित आकडा वाढत चालला आहे. यावर्षी शास्तीमाफी मिळणार नसल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच चार प्रभाग कार्यालयांना ४५ कोटींचे उद्दीष्ट देत त्याची पूर्तता न झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मालमत्ताधारकांचा कर जमा करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष महापालिकेच्या अर्थकारणावर थेट परिणाम करत आहे. मोचाईल टॉवर, व्यावसायिक मालमत्ताधारक व मोकळ्या भूखंड धारकांकडे कराची मोठी थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी चारही प्रभाग समिती कार्यालयांना येत्या महिनाभरात ४५ कोटींचे उद्दीष्ट दिले आहे. कर्मचाऱ्यांनी वसुली न केल्यास त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.

आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

थकबाकीदारांमध्ये अनेक शासकीय कार्यालयेही

मोकळे भूखंडधारक व व्यावसायिक मालमता धारकांनी महिनाभरात थकित कर न भरल्यास मालमता जप्त करण्यात येणार आहेत. आयुक्त डांगे यांच्या उपस्थितीत महापालिकेत कर वसुली व संकबाकीचा आढावा घेण्यात आला. शासकीय जिल्हा रुग्णालयाकडे तीन कोटी आणि जिल्हा परिषद, जुने कलेक्टर ऑफिस, पाटबंधारे विभाग, पंचायत समिती, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन व इतर शासकीय कार्यालयाकडे सुमारे सहा कोटी थकबाकी आहे. बंद पडलेल्या मोबाईल टॉवरकडे सुमारे चार कोटी, १६ हजार ५२४ व्यावसायिक मालमत्ताधारकाकडे सुमारे सात कोटी रुपये थकबाकी आहे.

आयुक्तांचा निर्धार किती काळ टिकणार ?

दरवर्षी डिसेंबर जवळ आला की शास्तीमाफीचे वारे वाहत असते. यावेळी आयुक्त डांग यांनी शास्तीमाफी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी ते त्यांच्या शब्दावर किती ठाम राहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जानेवारीमध्ये मनपाच्या निवडणुका होऊन लोकनियुक्त मंडळ सत्तेवर येईल. शास्तीमाफीचा अधिकार आयुक्तांना असला तरी लोकनियुक्त मंडळ यासाठी नेहमीच आग्रही असते. त्यांचा प्रशासनावर दबाव असतो. त्यामुळेच आयुक्तांचा निर्धार टिकेल का, हे पहावे लागेल.

मालमत्तेचा ताबा महापालिका घेणार

३३ हजार ४०७ मोकळ्या भूखंड धारकांकडे १२ कोटी रुपये थकबाकी आहे. एदिधल ते ऑक्टोबर अखेर ३५ कोटी रुपये वसुली झाली आहे. त्यामुळे येल्या महिनाभरात प्रभाग समिती एक व चार यांना प्रत्येकी १५ कोटी रुपये, प्रभाग समिती दोनला १० कोटी, प्रभाग समिती तीनला पाच कोटी असे ४५ कोटींचे उद्दीष्ट दिले आहे. वसुली न झाल्यास संबंधित अधिकारी व लिपिक यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले, तसे आदेशच आजच्या बैठकीत संबंधितांना देण्यात आले. ओपन प्लॉट व व्यावसायिक मालमता धारकांनी एक महिन्यात पैसे न भरल्यास प्लॉट किंवा व्यावसायिक मालमत्तेचा ताबा महापालिका घेणार असल्याचा इशाराही दिला आहे.

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

हे आहेत मोठे थकबाकीदार

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार आनंदऋषीजी ₹ हॉस्पिटल (१५ कोटी), केशर गुलाब मंगल कार्यालय (१.५० कोटी), शुभम मंगल कार्यालय (तीन कोटी), व्हिडिओकॉन (पाच कोटी) अशा व्यावसायिक मालमत्तांकडे थकबाकी आहे.

Web Title: The municipal corporation arrears keep increasing officials ordered to collect 450 million in a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 04:05 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • tax

संबंधित बातम्या

Leopard Attack: शेतातून बिबट्या आला अन् 5 वर्षीय चिमुरडीला थेट…; कुठे घडली हृदयद्रावक घटना?
1

Leopard Attack: शेतातून बिबट्या आला अन् 5 वर्षीय चिमुरडीला थेट…; कुठे घडली हृदयद्रावक घटना?

Ahilyanagar News: पांढरीपूल घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प! खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण
2

Ahilyanagar News: पांढरीपूल घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प! खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण

Ahilyanagar News: दिल्ली स्फोटानंतर शनिशिंगणापूरमध्ये तपासणी मोहीम सुरु
3

Ahilyanagar News: दिल्ली स्फोटानंतर शनिशिंगणापूरमध्ये तपासणी मोहीम सुरु

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड
4

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.