Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपुरात मंदिर समितीचा मोठा निर्णय; नवदाम्पत्यांना विठुरायाचे थेट दर्शन मिळणार

आता विठ्ठलाचे दर्शन थेट घेता येणार आहे. आता मंदिर समितीने तसा निर्णय घेतला आहे. परंतु, हा निर्णय कुणासाठी घेण्यात आला आहे? असा सवाल उपस्थित हाेत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 30, 2025 | 01:12 PM
पंढरपुरात मंदिर समितीचा मोठा निर्णय; नवदाम्पत्यांना विठुरायाचे थेट दर्शन मिळणार
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शन घेत असतात. गर्दीमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागते. परंतु, आता विठ्ठलाचे दर्शन थेट घेता येणार आहे. आता मंदिर समितीने तसा निर्णय घेतला आहे. परंतु, हा निर्णय कुणासाठी घेण्यात आला आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राज्यभराच्या अनेक भागातून विवाह झाला की, नवदाम्पत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र विठ्ठलाच्या दर्शन रांगेत नवदाम्पत्याला अनेक तास रांगेत उभे राहावे लागते. आता या नवीन जोडप्याला विठुरायाच्या दर्शनाला थांबावे लागणार नाही. नवदाम्पत्यासह त्याच्यासोबत आलेल्या तीन लोकांना विठ्ठलाच्या थेट दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता विवाह झालेल्या नवदाम्पत्याला रांगेल उभे न राहता सुलभपणे विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.

स्थानिकांना या वेळांत थेट दर्शन

पंढरपूर शहरातील स्थानिकांसाठी सकाळी सहा ते साडेसहा एवढाच वेळ दर्शनासाठी असायचा. परंतु, आता त्यात बदल करण्यात आला आहे. स्थानिकांना आता सकाळी सहा ते सात आणि रात्री दहा ते साडेदहा या वेळात आता थेट दर्शन दिले जाणार आहे. यासंदर्भातील निर्णयही मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : विरुद्ध दिशेनं जाणं पडलं महागात; भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

दिव्यांग, अतिवृद्धांसाठी झटपट दर्शन

विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे दिव्यांग आणि चालता न येणारे अतिवृद्ध यांना झटपट दर्शन दिले जाणार आहे. यासाठी व्हील चेअरची व्यवस्था केली जाणार आहे. विठुरायाच्या दर्शन रांगेत मृत्यू झालेल्या भाविकांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत व मृतदेह गावापर्यंत नेण्याचा खर्चही आता मंदिर समिती उचलणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : तासगाव पोलिसांनी सराईत चोरट्याला पकडले; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

माघीत ऑनलाइन, व्हीआयपी दर्शन बंद

दरम्यान, फेब्रुवारीत होणाऱ्या माघ यात्रेसाठी मंदिर समितीची बैठक झाली आहे. आषाढी आणि कार्तिकी या महायात्राप्रमाणेच माघी वारीत सुद्धा भाविकांना तशाच सुविधा दिल्या जाणार आहेत. माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

Web Title: The newlyweds will get a live darshan of vithuraya nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Pandharpur News
  • Solapur

संबंधित बातम्या

Horror Story: दूर किल्ल्यावरून माझ्याकडे पाहत होती… मोकळे केस, लालभडक वेश! मागेमागे घरात आली
1

Horror Story: दूर किल्ल्यावरून माझ्याकडे पाहत होती… मोकळे केस, लालभडक वेश! मागेमागे घरात आली

HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा
2

HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा

Shivsena : “होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप”, आदित्य आणि अमित ठाकरेंवर शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची घणाघाती टीका
3

Shivsena : “होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप”, आदित्य आणि अमित ठाकरेंवर शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची घणाघाती टीका

Chikhaldara Skywalk : मे पर्यंत पूर्ण होणार स्कायवॉक! आता पर्यटकांसाठी नवे थरार; देशातील पहिला काचेचा स्कायवॉक
4

Chikhaldara Skywalk : मे पर्यंत पूर्ण होणार स्कायवॉक! आता पर्यटकांसाठी नवे थरार; देशातील पहिला काचेचा स्कायवॉक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.