Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वातावरण पाहून भाजपात घाऊक इन्कमिंग; सक्षम उमेदवार शोधताना विरोधकांची तारांबळ

महापालिका निवडणुका जाहीर झाल्यावर वेगवेगळ्या पक्षात पक्षप्रवेश होतातच. स्थानिक राजकारण, एखाद्या पक्षाला अनुकूल वातावरण पाहून पक्षांतर होते. तसे याहीवेळी घडले. भाजपमध्ये अक्षरशः घाऊक प्रमाणात पक्ष प्रवेश झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 22, 2025 | 02:33 PM
वातावरण पाहून भाजपात घाऊक इन्कमिंग; सक्षम उमेदवार शोधताना विरोधकांची तारांबळ

वातावरण पाहून भाजपात घाऊक इन्कमिंग; सक्षम उमेदवार शोधताना विरोधकांची तारांबळ

Follow Us
Close
Follow Us:
  • वातावरण पाहून भाजपात घाऊक इन्कमिंग
  • सक्षम उमेदवार शोधताना विरोधकांची तारांबळ
  • महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न
पुणे/दीपक मुनोत : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यावर वेगवेगळ्या पक्षात पक्षप्रवेश होतातच. स्थानिक राजकारण, एखाद्या पक्षाला अनुकूल वातावरण पाहून पक्षांतर होते. तसे याहीवेळी घडले. भाजपमध्ये अक्षरशः घाऊक प्रमाणात पक्ष प्रवेश झाले. या पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया आपोआपच उमटल्या. त्याचे पडसाद आगामी काळात जाणवत राहतील. महापालिकेची सत्ता मिळविणे हे भाजपचे उद्दिष्ट्य आहे, पक्षाने ते काही लपवून ठेवलेले नाही. यातील काही नावे पाहता भाजपने २०२९ सालातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या असे निश्चित मानता येईल. महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता भाजपला आणायची आहे. त्याची आखणी करण्याची संधी म्हणून महापालिका निवडणुकीचा विचार भाजपने केला असाही अर्थ निघतो.

या पक्ष प्रवेशात काँग्रेस विचाराचे अधिक कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत. हिंदुत्वाचे काय ? असा प्रश्न निर्माण होतो. यावर भाजपचे उत्तर असे असते की हिंदुत्वाचे राजकारण पुढे रेटायचे असेल तर काही तडजोडी कराव्या लागतात. पक्षाने अजित पवार यांच्याशी युती केली तेव्हाही हेच समर्थन केले गेले. शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा मानणाऱ्या पवारांशी राजकीय तडजोड केली असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तेव्हा लोकसभा हे भाजपचे टार्गेट होते. यावेळी पुणे आणि आगामी विधानसभा अशी टार्गेट्स आहेत.

खडकवासला विधानसभा मतदार संघातील माजी नगरसेवक सचिन दोडके यांना भाजपमध्ये घेण्यात आले आहे. तर वडगाव शेरी मतदार संघातील पठारे, गलांडे या प्रभावशाली नेत्यांना पक्षाची दारे खुली केली आहेत. या दोन्ही मतदार संघात भाजपची मते वाढली आहेत, पण संघटनेचा पाया अधिक भक्कम करण्यावर नेत्यांनी भर दिला आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपमध्ये असेच इन्कमिंग झाले होते. पक्षाचे ९२ नगरसेवक निवडून आले. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले नगरसेवक चाळीसच्या आसपास होते. त्याही वेळी निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय अशा तक्रारी झाल्या होत्या. पण, निवडून येण्याची क्षमता हाच काँग्रेसचा निकष भाजपनेही लावला होता. सत्तेच्या आधारे बंडोबांना कुठेतरी सामावून घेता येईल अशी तयारी नेत्यांनी केली आहे. पुढील आठवडा हा पक्षात नाराजांची समजूत काढणे यासाठी राहील. भावनिक आवाहन करण्यासाठी भाजपकडे अनेक मुद्दे आहेतच.

सक्षम उमेदवार शोधताना विरोधकांची तारांबळ

पुणे शहरातील २० ते २५ जणांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला. यापूर्वीही शिवसेना उबाठाचे पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये आलेले आहेत. दोन वर्षात अनेकांचे भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेले आहेत. त्यामुळे विरोधकांना काही ठेवले आहे की नाही? अशी चर्चा होऊ लागली आहे. सक्षम उमेदवार शोधताना विरोधकांची धावपळ होणार आहे, हे दिसू लागले आहे. ४१ प्रभागात मिळून १६३ उमेदवार उभे करायचे आहेत आणि मोठ्या आकाराच्या प्रभागातून निवडणूक लढवायची आहे. याची जाणीव विरोधकांना झाली असावी.

Web Title: The oppositions problems have increased as many leaders from pune city have joined the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 02:33 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • pune news

संबंधित बातम्या

पालकमंत्र्यांना नाकारले, सोलापूर जिल्ह्याने भाजपला दिला दणका; मोहिते पाटलांची जादू कायम
1

पालकमंत्र्यांना नाकारले, सोलापूर जिल्ह्याने भाजपला दिला दणका; मोहिते पाटलांची जादू कायम

Akluj Municipal Council Election: अकलूज नगर परिषद निवडणुकीत बुलेटची पैज अंगलट; भाजप कार्यकर्त्याचा मोबाईल स्विच ऑफ
2

Akluj Municipal Council Election: अकलूज नगर परिषद निवडणुकीत बुलेटची पैज अंगलट; भाजप कार्यकर्त्याचा मोबाईल स्विच ऑफ

PMC Elections 2025 : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती? दादा-ताईंमध्ये ठरली राजनीती? अजित पवारांच्या बड्या नेत्याचा दावा
3

PMC Elections 2025 : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती? दादा-ताईंमध्ये ठरली राजनीती? अजित पवारांच्या बड्या नेत्याचा दावा

राजकीय घडामोडींना वेग, राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरुच; ‘या’ बड्या नेत्यांनी केला प्रवेश
4

राजकीय घडामोडींना वेग, राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरुच; ‘या’ बड्या नेत्यांनी केला प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.