Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंत्राटदाराचा मनमानी कारभार; वाखरी ते पंढरपूर रस्त्याच्या दुपदरीकरणाचे भिजत घोंगडे

आषाढी वारीसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांना वाखरी ते पंढरपूर दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आणि अपूर्ण कामामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 01, 2025 | 03:41 PM
रस्ता नसल्याचा रुग्णाला पुन्हा फटका; झोळीतून नेण्यात आले रुग्णालयात

रस्ता नसल्याचा रुग्णाला पुन्हा फटका; झोळीतून नेण्यात आले रुग्णालयात

Follow Us
Follow Us:
Pandharpur News:  वाखरी ते पंढरपूर रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम मागील दोन-तीन महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून, ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे लाखोंच्या संख्येने पायी येणाऱ्या वारकऱ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत.वाखरी ते इसबावी दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजू खोलून ठेवण्यात आल्यामुळे पायी चालणाऱ्यांसाठी मार्ग अत्यंत अरुंद आणि धोकादायक बनला आहे. अपघाताचा धोका वाढला असून, अनेक वारकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.सामान्य नियमानुसार, आषाढी वारीपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाही काम अपूर्ण राहिल्याने वारकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी “हे काम म्हणजे प्रशासनाचे भिजत घोंगडे” अशी टीका होत आहे. जिल्हाधिकारी यांनी २५ जूनपूर्वी सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने आदेशाचे पालन केले नसल्यामुळे रस्ता अद्यापही अपूर्ण स्थितीत आहे. विशेषतः रस्ता खोदून तसेचच सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल, खड्डे आणि अरुंद जागा तयार झाली आहे.

क्षणिक आनंद महागात पडला! हवेत लटकताच आत्मा गेला सोडून, बंजी जंपिंग करताना हाड मोडलं अन् जागीच

या संपूर्ण प्रकरणावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.आषाढी वारीसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांना वाखरी ते पंढरपूर दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आणि अपूर्ण कामामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावर टाकलेला निकृष्ट दर्जाचा, मातकट मुरूम निसरडा झाला असून, अनेक ठिकाणी घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून, अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे.

Bangladesh Politics : बांगलादेशाच्या राकारणात पुन्हा मोठी उलथापालथ; संविधान स्थगित करण्याचा निर्णय

“कसे जायचे भाविक भक्तांनी?”  सवाल वारकऱ्यांचा

“रस्त्याची स्थिती पाहून मन सुन्न होतं. वारकरी कसे सुरक्षित पोहोचणार? प्रशासनाने तातडीने लक्ष घालावं,” अशी मागणी पुण्यातील वारकरी श्याम पाचडे यांनी केली आहे.

कामाची बिनधास्तपणे दिरंगाई; प्रशासनाचे दुर्लक्ष निषेधार्ह

वाखरी-पंढरपूर मार्गावर सुरू असलेल्या दुपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराची मनमानी दिसून येत असून, काम अत्यंत संथ गतीने आणि निष्काळजीपणे सुरू आहे. अपूर्ण काम आणि मुरूमाच्या निकृष्ट प्रतीमुळे रस्ता विस्कळीत झाला आहे. प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार माध्यमांतून तक्रारी जाऊनही ठोस कारवाई होत नसल्याने वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. “पावसात अपघात झाले, तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवालही वारकरी विचारत आहेत.

 

Web Title: The plight of the warkari people is due to the delay in the work of doubling the wakhri to pandharpur road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • Pandharpur News
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
1

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं
2

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.