Bangladesh Politics : बांगलादेशाच्या राकारणात पुन्हा मोठी उलथापालथ; संविधान स्थगित करण्याचा निर्णय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Bangladesh News marathi : ढाका : पुन्हा एकदा बांगलादेशात मोठा गोंधळ सुरु झाला आहे. पुन्हा एकदा बांगलादेशाच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये एक मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या घोषणेने बांगलादेशाच्या राजकीय व्यवस्थेत मोठा बदल घडून येण्याची शक्यता आहे.बांगलादेशाचे संविधान तात्पुरते स्थिगत करण्यावर सध्या बांगलादेशात विचार सुरु आहे.
नुकतेच बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणूका २०२६ एप्रिल मध्ये घेण्याची घोषणा मोहम्मद युनूस यांनी जाहीर केली होती. दरम्यान या नंतर बांगलादेशात मोठा वाद सुरु झाला होता. विरोधी पक्षाकडून २०२५ च्या अखेरपर्यंत निवडणूक घेण्याची मागणी केली जात होती. मोहम्मद युनूस यांच्या पायउताराची मागणी होत असताना त्यांनी हा निर्णय घोषित केला होता. दरम्यान त्यांच्या या निर्णयानंतर अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आले.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या पक्षाने एप्रिल २०२६ मध्ये निवडणुकी घेण्याला विरोध केला होता. तर माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी पक्षाने मोहम्मद युनूस त्यांच्या वैयक्तिक हेतू साधत असल्याचे म्हटले होते. अवामी लीगने मोहम्मद युनूस बांग्लादेश अमेरिकेला विकत असल्याचाही आरोप केला होता. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.
दरम्यान पुन्हा एकदा बांगलादेशात संविधान निलंबित करण्याची मागणी केली जात आहे.मीडिया रिपोर्टनुसार, १९७२ चे संविधान बांगलादेशातील नवीन सुधारणांमध्ये अडथळा निर्माण करत आहे. यामुळे देशात नवीन राजकीय व्यवस्था स्थापन करण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट ५ रोजी विद्यार्थी जन आंदोलन झाले होते. यामुळे व्यवस्थेत बदलाची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र अद्यापही कोणताही बदल बांगलादेशाच्या राजकीय व्यवस्थेत झालेला नाही. यामुळे सध्या राजकीय व्यवस्थेत बदल करण्याती मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. संविधान काही काळासाठी स्थिगत ठेवावे आणि आवश्यक सुधारणा कराव्यात असे म्हटले जात आहे.
मसुदा योजनेनुसार संविधान स्थगित झाल्या मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे अध्यक्ष बनता येईल. तसेच बीएनपीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान हे मुख्य सल्लागाराच्या पदी नियुक्त केले जाऊ शकतात. याशिवाय जमात-ए-इस्लामीचे प्रमुख डॉट. शफीखुर रहमान यांची उप-सल्लागारपदी निवड होईल. यानंतर नवीन सरकार स्थापन होण्यास सुरुवात होईल. याशिवाय बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुका आणखी पुढे ढकलल्या जातील. परंतु सध्या संविधान स्थगित करण्यावरुन बांगलादेशात वाद सुरु आहे. अनेक राजकीय पक्षांनी याला विरोध केला आहे.