Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन पाडव्याला हापूस महाग; उत्पादनात मोठी घट झाल्याने दरात उसळी

पुणे मार्केटयार्डात सध्या हापूसची आवक अत्यल्प आहे. दररोज केवळ १५० ते २०० पेट्यांचीच नोंद होत असून, गेल्या वर्षी याच कालावधीत दोन ते तीन हजार पेट्यांची आवक होत होती. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 19, 2026 | 11:55 AM
ऐन पाडव्याला हापूस महाग; उत्पादनात मोठी घट झाल्याने दरात उसळी

ऐन पाडव्याला हापूस महाग; उत्पादनात मोठी घट झाल्याने दरात उसळी

Follow Us
Follow Us:

पुणे : यंदाच्या हंगामात हवामानातील अनिश्चितता आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे हापूस आंबा उत्पादनात मोठी घट झाली असून, ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावरच आंब्याचे दर गगनाला भिडले आहेत. कोकणातील उत्पादन ६० ते ७० टक्क्यांनी घटल्याचा अंदाज व्यक्त होत असून, बाजारात आवक कमी झाल्याने ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

पुणे मार्केटयार्डात सध्या हापूसची आवक अत्यल्प आहे. दररोज केवळ १५० ते २०० पेट्यांचीच नोंद होत असून, गेल्या वर्षी याच कालावधीत दोन ते तीन हजार पेट्यांची आवक होत होती. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली असली, तरी पुरवठा अपुरा पडत असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात हापूसचा दर डझनमागे सुमारे १,५०० ते ३,५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

यंदा कोकणात परतीच्या पावसाचा मोठा परिणाम झाला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने प्रारंभी मोहोर चांगला आला; मात्र त्यानंतर तापमानातील चढ-उतार आणि दमट वातावरणामुळे मोहोरावर विपरीत परिणाम झाला. परिणामी मोठ्या प्रमाणात वांजमोहोर दिसून आला आणि अपेक्षित फळधारणा झाली नाही.

याशिवाय, थ्रिप्स आणि तुडतुड्या (हॉपर) किडींच्या प्रादुर्भावाने स्थिती अधिकच बिकट केली. या किडींमुळे मोहोर गळणे, फळांची वाढ खुंटणे आणि गुणवत्तेत घट होणे, अशा समस्या निर्माण झाल्या. परिणामी बागायतदारांच्या हाती केवळ ३० ते ४० टक्के उत्पादन लागल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवाढीमुळे यंदा सर्वसामान्य ग्राहकांना हापूसची चव चाखण्यासाठी अक्षय्य तृतीयेपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते, असे चित्र आहे.

व्यापाऱ्यांचे म्हणणे नेमके काय?

बदलत्या हवामानासह किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे, गेल्या दोन दशकांत प्रथमच एवढा तुटवडा जाणवत आहे. गुढीपाडव्याला हापूसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत,” असे आंबा व्यापारी मनोज शिंदे यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : Alphonso Mango: आंबा, काजू बागायतदारांचा आक्रोश मोर्चा; मंत्री नितेश राणे काय म्हणाले?

Web Title: The price of hapus is expensive at the time of padwa due to productivity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.