Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधवा भगिनींबाबत दुजाभाव विरोधी चळवळीचा हेतु महिलांच्या सन्मान भावनेचा!: डॉ. नीलम गोऱ्हे

ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार शहरी आणि ग्रामीण भागातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रथम लोकांच्यामध्ये जनजागृती होऊन अधिकाधिक प्रमाणात या महिलांचा विकास आणि पुनर्वसन व्हावे, यासाठी सामाजिक संस्था, प्रशासन आणि समाजाने एकत्रितरित्या पुढे यावे असे आवाहन आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 28, 2022 | 04:30 PM
विधवा भगिनींबाबत दुजाभाव विरोधी चळवळीचा हेतु महिलांच्या सन्मान भावनेचा!: डॉ. नीलम गोऱ्हे
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम समाजाच्या विकासासाठी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक घटकांचा विकास होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करण्याच्या ठरावाबद्दल त्यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे. याविषयी नुकतेच ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार शहरी आणि ग्रामीण भागातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रथम लोकांच्यामध्ये जनजागृती होऊन अधिकाधिक प्रमाणात या महिलांचा विकास आणि पुनर्वसन व्हावे, यासाठी सामाजिक संस्था, प्रशासन आणि समाजाने एकत्रितरित्या पुढे यावे असे आवाहन आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.

विधान परिषद उपसभापती कार्यालय, स्त्री आधार केंद्र, विधवा महिला सन्मान कायदा अभियान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विधान भवन,पुणे येथे विविध सामाजिक संस्था सोबत परिवर्तन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘महिला आणि त्यांचे सामाजिक प्रश्न यावर काम होणे आवश्यक आहे. समाजाने यासाठी आपली मानसिकता आणि दृष्टिकोन यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. महिलांचे प्रश्न हे प्रांत,जात व धर्माच्या पलीकडले आहेत. विवाह हा संस्कार असून तो समानते वर टिकतो. समाजामध्ये महिलांना दूजाभावाने वागवू नये व विधवांच्या प्रती असणाऱ्या अनिष्ट रूढी व परंपरा यांना नष्ट होणे आवश्यक आहे. यासाठी समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. ‘

सामाजिक कार्यकर्ते आणि या अभियानाचे प्रवर्तक प्रमोद झिंजाडे यांनी यामागील भूमिका स्पष्ट केली. स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी यांनी प्रास्ताविक केले.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी, ‘पुणे जिल्ह्यामध्ये ग्राम पंचायत हद्दीतील मालमत्ता पत्रकी पुरुषा बरोबर त्याच्या पत्नीचे नाव ही घेण्या बाबत जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्याचे सांगितले. तसेच ८८% घर पत्रकावर दोघांची ही नावे आहेत.’

यावेळी उपस्थित महिलांच्या मध्ये दोन गटचर्चा घेण्यात आल्या. यामध्ये अनेक महिलांनी स्वतःचे अनुभव कथन करून ह्या प्रथेचा झालेला झालेला त्रास सांगितला व समाजाची मानसिकता बदलण्यासाठी ग्रामीण स्तरावर उपाय योजना गरजेची असल्याचे मांडले. समाजामध्ये असलेला विधवेप्रती असणारा दृष्टिकोन, त्यांना येणारे विविध विचित्र अनुभव आणि या विषयात भविष्यात करावयाच्या कामाचे नियोजन याविषयी चर्चा झाली. स्त्री आधार केंद्राच्या सुनीता मोरे, विजया शिंदे, अनिता शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

[read_also content=”एखाद्या निष्पापाला अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्याना शिक्षा झाली पाहिजे : दिलीप वळसे पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/those-who-try-to-trap-an-innocent-person-should-be-punished-dilip-walse-patil-nrdm-285836.html”]

पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, विविध तालुक्यांचे गटविकास अधिकारी, स्त्री आधार केंद्राच्या अनिता शिंदे, विभावरी कांबळे, रमेश शेलार, गौतम गालफाडे, लहानु अबनावे, अनिता परदेशी,आश्लेषा खंडागळे, वैशाली घोरपडे,नंदिनी जाधव,अनुराधा सहस्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीला अहमदनगर, सातारा, सांगली, लातूर, सोलापूर, मुंबई, नवी मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणांवरून सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The purpose of the anti violence movement against widowed sisters is to make women feel honored dr neelam gorhe nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2022 | 04:30 PM

Topics:  

  • C M Uddhav Thackeray
  • cmomaharashtra
  • dr. Neelam Gorhe
  • NAVARASHTRA
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस
1

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण
2

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक
3

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी
4

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.