Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; अध्यक्षपदी उषा पाटील अन् उपाध्यक्षपदी दयानंद सुरवसे

लातूर जिल्हा परिषदेत अखेर महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 17, 2026 | 12:56 PM
Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा! जि.प. बांधकाम सभापती पदावरून रस्सीखेच सुरू

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा! जि.प. बांधकाम सभापती पदावरून रस्सीखेच सुरू

Follow Us
Follow Us:

लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या वलांडी गटातील उमेदवार उषा संभाजी पाटील (तळेगावकर) यांची अध्यक्षपदी तर जानवळ गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे दयानंद दामोदर सुरवसे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले.

 

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उषा पाटील यांना 34 मते, तर काँग्रेसच्या दीपाली शामराव भोसले यांना 25 मते मिळाली. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदासाठी दयानंद सुरवसे यांना 34 मते, तर काँग्रेसच्या नागेश्वरी सचिन केंद्रे यांना 25 मते मिळाली. सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली.

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर पटकावला सरळ विजय

भाजपाच्या वतीने अध्यक्षपदासाठी उषा पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने उपाध्यक्षपदासाठी दयानंद सुरवसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कॉंग्रेसच्या वतीने अध्यक्षपदासाठी लांबोटा गटाच्या मानसी प्रमोद मरुरे, मातोळा गटाच्या दीपाली शाम भोसले आणि आर्वी गटाच्या राजश्री धनंजय देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या नागेश्वरी सचिन केंद्रे, मुकेश भालेराव आणि अश्विनी दत्तात्रय शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यानंतर मानसी मरुरे व राजश्री देशमुख यांनी अध्यक्षपदाचे तर मुकेश भालेराव व अश्विनी शिंदे यांनी उपाध्यक्ष पदाचे अर्ज मागे घेतल्याने सरळ लढत झाली. अखेरीस मतदान प्रक्रियेत भाजप-राष्ट्र‌वादी आघाडीचे उमेदवार विजयी झाले. उषा पाटील या माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या समर्थक मानल्या जातात, तर राष्ट्रवादीचे दयानंद सुरवसे हे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या गटातील मानले जातात.

हे सुद्धा वाचा : थकबाकीदारांसाठी अभय योजना ठरतेय फायद्याची; महापालिकेच्या तिजोरीत 954.78 कोटी जमा

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सह्यांचे राजकारण

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांकडून लॉबिंगचे राजकारण रंगू लागले आहे. पक्षाने उमेदवार निवडीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवले असतानाही काही इच्छुकांकडून सदस्यांच्या सह्या गोळा करून शिफारस व पाठिंब्याची पत्रे तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ५१ सदस्य असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर पक्षाचीच निवड होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उमेदवार ठरविण्याचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या निर्णयानुसारच अधिकृत उमेदवारांची घोषणा होणार आहे.

Web Title: The selection process for the posts of president and vice president of latur zilla parishad has been completed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • BJP
  • Latur news
  • Latur Politics

संबंधित बातम्या

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा
1

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
2

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

‘सुविधा सुधारा, अन्यथा…’; आरोग्य केंद्रातील सुविधांवरून संताप; भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांचा प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम
3

‘सुविधा सुधारा, अन्यथा…’; आरोग्य केंद्रातील सुविधांवरून संताप; भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांचा प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम

क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, लातूर-लामजना महामार्गावर तीव्र आंदोलन; नेमकं मागण्या काय?
4

क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, लातूर-लामजना महामार्गावर तीव्र आंदोलन; नेमकं मागण्या काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.