माथेरान: माथेरान शहरात पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत होते.मात्र त्या क्ले पेव्हर ब्लॉक मध्ये सिमेंट आहे असा आरोप करून पर्यावरण वादी यांनी हे काम सर्वोच्य न्यायालयात धाव घेतल्याने थांबले होते. दरम्यान, सर्वोच्य न्यायालयाने क्ले पेव्हर ब्लॉक बद्दल राष्ट्रीय पर्यावरण संस्था अर्थात निरी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
आता निरीचां अहवाल आला असून माथेरान मध्ये वापरण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक मध्ये सिमेंट नाही हे सिद्ध झाले आहे.त्यामुळे माथेरान शहरात गेली दोन वर्षे थांबवून ठेवलेल्या 13 रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक लावण्याची कामे पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुप्रीम कोर्टाने 19 मार्च 2025 रोजी नीरी या पर्यावरणवर अभ्यास करणाऱ्या संस्थेला माथेरान येथे वापरण्यात येणाऱ्या क्ले पेव्हर ब्लॉक्स मुळे मातीची धूप थांबू शकते का? याचा अभ्यास करून अभिप्राय सादर करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर निरीचे शास्त्रज्ञ डॉ निदेश पी वी आणि डॉ नितीन गोयल यांनी तीन आणि चार एप्रिल रोजी माथेरान मध्ये येऊन क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्त्याची पाहणी केली होती.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सुचनेने सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारी 2003 मध्ये माथेरानला पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील जाहीर केले होते.मात्र माथेरान मधील दगड मातीच्या रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात मातीची धूप होते आणि पर्यावरण उध्वस्त होते यावर क्ले ब्लॉक्स चा पर्याय सनियंत्रण समितीने सुचविला होता.त्या सूचनेनुसार माथेरान शहरात क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आणि अभ्यास केला गेला होता.शहरात साधारण 8 ते 10 किमी लांबीचा रस्ते क्ले पेव्हर ब्लॉक चे बनले आहेत.त्यामुळे शहरातील क्ले पेव्हर ब्लॉक चे रस्ते आणि जांभा दगड रस्ते यांचा अभ्यास निरी कडून माथेरान शहरात करण्यात आला.
दुसरीकडे जांभा दगड घोड्यांच्या टापामुळे माती होते तर क्ले पेव्हर ब्लॉक मध्ये सिमेंट नसून फक्त माती असल्याचा अभिप्राय या पूर्वी पवई मुंबई येथील आय आय टी या संस्थेने दिला होता. त्यामुळे माथेरान शहरातील रस्त्यांवर क्ले पेव्हर ब्लॉक लावण्याची कामे फेब्रुवारी २०२३ पासून थांबवण्यात आली होती.त्यात शहरात १३ रस्त्यावर सुरू असलेले क्ले पेव्हर ब्लॉक चे रस्त्यांची कामे थांबून ठेवण्यात आली होती.राष्ट्रीय पर्यावरण संस्था तथा निरी यांनी सादर केलेल्या अहवालावर 29 एप्रिल रोजी सर्वोच्य न्यायालयात युक्तिवाद झाला.त्यावेळी ॲड ए परमेश्वर यांनी क्ले पेव्हर ब्लॉक हे माथेरान मध्ये योग्य असल्याने याचा वापर करण्याची मागणी केली.त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून पासून स्थगित असलेल्या रस्त्यांच्या कामाला पुन्हा सुरवात होऊ शकते नागरिकांची गैरसोय थांबेल असा विश्वास व्यक्त होत आहे.