BMC Mayoral Election: मुंबई उपमहापौरपदासाठी मोठी फिल्डिंग:शिंदे गटाकडून दोन महिला नेत्या मैदानात
७ फेब्रुवारी २०२६: महापौरपदासाठी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार.
११ फेब्रुवारी २०२६ (दुपारी १२:०० वाजता): विशेष सभेचे आयोजन आणि महापौरपदाची अधिकृत घोषणा.
अर्ज माघार: सभागृह सुरू होण्यापूर्वी १५ मिनिटे आधीपर्यंत अर्ज मागे घेता येईल.
Solapur Crime: आमदारांच्या घराशेजारी रक्तरंजित घटना; ऊसतोड मजुराने पत्नीची निर्घृण हत्या
मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपच्या महापौरपदासाठी शीतल गंभीर-देसाई आणि रितू तावडे यांची नावे आघाडीवर आहेत. उपमहापौरपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिले जाणार आहे. हे पद महिलेला मिळण्याची दाट शक्यता असून, दोन अनुभवी नगरसेविकांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
सुधार समितीचे अध्यक्षपदही शिंदे गटाला मिळणार असून, या पदावर पुरुषाची वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा) गटानेही मोर्चेबांधणी सुरू केली असून, संख्याबळ नसतानाही ते उमेदवार उभा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापौर पदासाठी रूपा राणी निकम यांच्या निवडीनंतर आता उपमहापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दोन दिग्गज महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
१. तृष्णा विश्वासराव:
तृष्णा विश्वासराव या शिवसेनेच्या (शिंदे गट) अत्यंत अनुभवी नेत्या मानल्या जातात. २०१४ मध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेत पहिली महिला सभागृह नेते म्हणून काम पाहिले आहे. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि पक्षावरील निष्ठा यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे.
२. यामिनी जाधव:
यामिनी जाधव या देखील पक्षाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. २०१४ मध्ये महापौरपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित असताना यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, ऐनवेळी स्नेहल आंबेकर यांची निवड झाल्याने त्यांची संधी हुकली होती. त्यावेळी हुलकावणी मिळालेले मानाचे पद आता ‘उपमहापौर’ रूपाने त्यांना मिळावे, असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. या महत्त्वपूर्ण निवडणुकीच्या तोंडावर ‘फोडाफोडी’ टाळण्यासाठी आणि आपले संख्याबळ अबाधित राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे.
राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना निर्देश दिले आहेत. ११ फेब्रुवारीच्या मतदानापर्यंत आणि त्यानंतरच्या काही दिवसांसाठी (१५ फेब्रुवारीपर्यंत) कोणत्याही नगरसेवकाने मुंबईबाहेर जाऊ नये. ८ फेब्रुवारीला रविवार आणि ९ फेब्रुवारीला कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा आहे. या निमित्ताने अनेक नगरसेवक कोकणात जाण्याची शक्यता होती. मात्र, पक्षांनी त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत अनिवार्यपणे मुंबईत हजर राहण्याचे कडक आदेश दिले आहेत.
७ फेब्रुवारी: महापौरपदासाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख.
११ फेब्रुवारी (दुपारी १२:०० वाजता): महानगरपालिकेच्या मुख्यालयात विशेष सभेचे आयोजन केले असून, याच दिवशी नव्या महापौर आणि उपमहापौरांची घोषणा होईल.
आरक्षण: यंदा मुंबईचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
३. महापालिकेतील पक्षीय बलाबल (२०२६ निकाल)
निवडणुकीनंतरचे चित्र पाहिले तर कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसले तरी महायुती (भाजप + शिंदे गट) बहुमताच्या जवळ आहे.






