Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालत्या एक्सप्रेसवर पडला दरोडा! पोलिसांच्या हातावर तुरी देऊन महिला प्रवाशांचं सोनं लुटलं

नांदेड छत्रपती संभाजीनगर लोहमार्गावरील मानवत रोड येथे साईनगर शिर्डी एक्सप्रेसमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी रेल्वे रोखून महिला प्रवाशांना लुटले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 17, 2026 | 04:49 PM
Theft on the Sainagar Shirdi Express Gold Jewelry Stolen from Female Passengers

Theft on the Sainagar Shirdi Express Gold Jewelry Stolen from Female Passengers

Follow Us
Follow Us:

Crime News : परभणी : जिल्ह्यातील मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी (दि.१६) पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी केबल कापून सिग्नलशी छेडछाड करत साईनगर शिर्डी एक्सप्रेस रोखली. रेल्वे (Railway News) थांबल्यानंतर चोरट्यांनी जनरल डब्बा आणि आरक्षित डब्ब्यावर हल्ला चढवून काही महिला प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले. गाडीतील रेल्वे पोलिस त्या डब्यामध्ये येताच चोरटे पसार झाले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न नव्याने ऐरणीवर आला आहे.

 

नांदेड छत्रपती संभाजीनगर लोहमार्गावरील मानवत रोड येथे साईनगर शिर्डी एक्सप्रेसला अधिकृत थांबा नाही. ही गाडी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास स्थानकात येण्यापूर्वीच अज्ञात चोरट्यांनी सिग्नलची केबल कापून टाकत सिग्नल यंत्रणामध्ये बिघाड केला. चालकाला होम सिग्नल डेंजर दिसल्याने त्याने खबरदारी म्हणून गाडी प्लॅटफॉर्मपासून काही अंतरावरच थांबवली आणि याच संधीचा फायदा घेत दरोडेखोरांनी डब्यांमधील प्रवाशांवर हल्ला चढवला. महिलांमधील दागिने अक्षरशः ओरबाडून घेण्यात आले.

हे देखील वाचा : सुषमा अंधारेंनी अभिनेत्री प्राजक्ता माळीला धरले धारेवर; “महिला अत्याचारावर ब्र शब्द नाही अन्…

पहाटेच्या वेळेस बहुतांश प्रवासी गाढ झोपेत असतानाच अचानक रेल्वेवर दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली. काही डब्याचे दरवाजे आतून बंद असल्याने आरक्षित डब्यामध्ये चोरट्यांना घुसता आले नाही म्हणून मोठा अनर्थ टळला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.

वाहतूक खोळंबली

आरपीएफ क्राईम ब्रँचचे उपनिरीक्षक दिलीप कांबळे, जीआरपीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश जोगदंड व त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे रेल्वे वाहतुक तब्बल ४० मिनिटे खोळंबली होती. सिग्नल यंत्रणा दुरुस्त झाल्यानंतर रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली. एका महिला प्रवासाने छत्रपती संभाजीनगर पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली आहे. मानवतरोड हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून याठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी रेल्वे पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने अनेकदा केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चोरट्यांचे धाडस वाढले असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता दरोड्याच्या या घटनेनंतर तरी ही मागणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा : MNS राज ठाकरेंचा महिला आरक्षण अन् मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा की विरोध? स्पष्ट केली भूमिका

अचानक रेल्वेवर दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली. काही डब्याचे दरवाजे आतून बंद असल्याने आरक्षित डब्यामध्ये चोरट्यांना घुसता आले नाही म्हणून मोठा अनर्थ टळला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे श्वान पथक

Web Title: Theft on the sainagar shirdi express gold jewelry stolen from female passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • crime news
  • Indian Railway
  • Parbhani News

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.