Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय पक्षांची चिंता वाढणार? मनोमिलनाला आव्हान देणार तिसरी आघाडी; नाराजांच्या बंडखोरीची शक्यता

सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी या दोन्ही राजांच्या नोंदणीकृत आघाड्या आहेत. दोन्ही आघाड्यांकडून स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण अशा दोन्ही लढतींचा प्रस्ताव दिला जाईल. राजकीय महत्त्वकांक्षा कोणाच्याच लपून राहिलेल्या नाहीत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 05, 2025 | 11:48 AM
राजकीय पक्षांची चिंता वाढणार? मनोमिलनाला आव्हान देणार तिसरी आघाडी; नाराजांच्या बंडखोरीची शक्यता

राजकीय पक्षांची चिंता वाढणार? मनोमिलनाला आव्हान देणार तिसरी आघाडी; नाराजांच्या बंडखोरीची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : मनोमिलन होवो की न होवो सातारा नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांमध्ये दोन्ही राजेंचे समर्थक उमेदवार असतील. मात्र, दोन्ही राजांना आव्हान देणारी तिसरी आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुप्त पातळीवर सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी मोट बांधण्याचे प्रयत्न येत्या काही दिवसात गतिमान होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. मनोमिलनाच्या शिलेदारांना आव्हान देणे तिसऱ्या आघाडीसाठी अग्निपरीक्षा ठरणार असली तरी भाजपच्या निष्ठावंतांची नाराजी आणि नव्या दमाचे मेहरबान यांना तिसऱ्या आघाडीला चुचकारावे लागेल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम सुरू झाले आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या संस्थांच्या निवडणुकीसाठी शासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. राजकीय हालचाली सुद्धा गतिमान होत आहेत. ‘माझे मन मोठे आहे. मात्र, शिवेंद्रसिंहराजे बिझी आहेत’, असे म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोमिलनाच्या चर्चांना हवा देण्याचा प्रयत्न केला होता. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे हे सुद्धा राजकारणात मुरलेले असल्याने त्यांनी याबाबतचा निर्णय थेट पक्षश्रेष्ठींकडे सोपवून आपली सुटका करून घेतली आहे. मात्र, तरीही बंडखोर आणि तिसरी आघाडी यांची शक्यता लक्षात घेता ‘मी आणि तू’ याच्या पलीकडे साताऱ्याच्या राजकारणाचा परिघ नको म्हणून दोन्ही राजे एकत्र येऊ शकतात.

२००७ च्या ऐतिहासिक मनोमिलनात तिसऱ्या आघाडीने आव्हान दिल्याने दोन्ही राजे अदालतवाड्याच्या साक्षीने एकत्र आले होते. पुढील १० वर्ष सातारा नगरपालिकेने मनोमिलन अनुभवले मात्र २०१९ च्या निवडणुकीत राजघराण्यातील सत्ताविरुद्ध सर्वसामान्य स्त्री असा संघर्ष उभा करून उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने एकतर्फी लढत जिंकली होती. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांचा पराभव ही शिवेंद्रराजे यांच्यासाठी ठसठसणारी जखम ठरली होती. मात्र, दरम्यानच्या काळात साताऱ्याच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

सहा वर्षांपासून दोन्ही राजे एकत्र

दोन्ही राजे गेल्या ६ वर्षात टप्प्याटप्प्याने भारतीय जनता पार्टीत दाखल झाले. एकमेकांवर तोंडसुख घेणारे दोन्ही राजे आधी लोकसभा नंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने एकत्र आले. उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना राजकीय झप्पी देत सगळे मतभेद मिटवून टाकले. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्ष आज्ञा पाळून उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीत मताधिक्य तर दिलेच शिवाय बंधूप्रेमाची प्रचितीसुद्धा दिली.

मनोमिलन जर झाले तर बंडखोरी होणार

सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी या दोन्ही राजांच्या नोंदणीकृत आघाड्या आहेत. दोन्ही आघाड्यांकडून स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण अशा दोन्ही लढतींचा प्रस्ताव दिला जाईल. पण राजकीय महत्त्वकांक्षा कोणाच्याच लपून राहिलेल्या नाहीत. मनोमिलन जर झाले तर बंडखोरी ही होणार हे उघड आहे.

बंडखोर उमेदवारांची बक्कळ यादी तयार होणार

२५ प्रभागात दोन्ही आघाड्या व बंडखोर उमेदवार यांची बक्कळ यादी तयार आहे. नगराध्यक्ष आरक्षणासह २५ प्रभागांची राजकीय समीकरणे हाताळताना दोन्ही राजांना आपले राजकीय कसब पणाला लावावे लागेल. भाजपचे मूळ निष्ठावंत अजूनही दोन्ही राजांच्या राजकीय रेट्यात भरडले जात आहे. २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे ६ नगरसेवक निवडून आले होते. तसेच दोन्ही राजांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारी तिसरी फळी सुद्धा साताऱ्यात शिल्लक आहे.

शशिकांत शिंदे राजकीय मोट बांधण्याच्या तयारीत

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे हे साताऱ्यात तिसरी मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. साताऱ्यात जर भाजपच्या सत्तेला सुरुंग लावला आणि त्या राजकीय डावपेचात ते यशस्वी झाले तर त्यांच्या राजकीय कर्तबगारीची मोठी चुणूक असेल. तिसऱ्या आघाडीला ताकद देण्यासाठी राष्ट्रवादी विशेषत: जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पवार यांचा प्रयत्न राहणार हे उघड आहे.

Web Title: Third alliance may be form for upcoming elections in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Satara Politics
  • Shashikant Shinde
  • Shivendrasinh Bhosale
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
3

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
4

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.