सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी या दोन्ही राजांच्या नोंदणीकृत आघाड्या आहेत. दोन्ही आघाड्यांकडून स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण अशा दोन्ही लढतींचा प्रस्ताव दिला जाईल. राजकीय महत्त्वकांक्षा कोणाच्याच लपून राहिलेल्या नाहीत.
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. खासदार उदयनराजे भोसले व मी स्वतः भाजपमध्ये एकाच पक्षात असून त्याचे आम्ही जबाबदार पदाधिकारी आहोत.
छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाद टी पॉइंटचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
2016 च्या पालिका निवडणुकीमध्ये उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीने 22 व शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगर विकास आघाडीने 12 जागा तर भारतीय जनता पार्टीने 6 जागा निवडून आणल्या होत्या.
विधानसभेत पाच वेळा संधी दिल्यानंतर आता मंत्रिपद मिळाले आहे. पूर्वी दुसरीकडे जाऊन आपल्याला कामे मागावी लागत होती. आता आपल्याकडेच कामे देण्याचे मंत्री म्हणून अधिकार मिळाले आहेत.
एसटी महामंडळाच्या मेढा आगाराला नुकत्याच नवीन ८ एसटी बसेस मिळाल्या. बसेसच्या लोकार्पण सोहळ्यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तिकीट काढून एसटी बसमधून फेरफटका मारत एसटी प्रवासाचा आनंद लुटला.