Thousands Maratha protesters go to Mumbai from Nashik to Manoj Jarange Patil protest
Maratha Reservation : नाशिक : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत. यासाठी त्यांचा लाखो समर्थकांसह आणि मराठा बांधवांसह मोर्चा निघाला आहे. जुन्नर मार्गे जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. प्रशासन आणि कोर्टाच्या अटीशर्तींसह एक दिवसाच्या अधिवेशनाला परवानगी देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाचा आक्रमकपणा नाशिकमध्ये देखील दिसून आला आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये बैठक पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाचे बांधव जेवणाच्या सामग्री पुरविण्याची जबाबदारी घेणार आहे. त्यामध्ये यावेळी नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाकडून खास स्टिकर तयार करण्यात आले आहेत. दुचाकीसह चारचाकी वाहनांना ते लावण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्याला एका दिवसाची आंदोलनाची जबाबदारी दिली तरी नाशिकमधून ५ हजार आंदोलक आझाद मैदानावर आंदोलन करतील अशी तयारी यावेळी करण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आरक्षणापर्यंत आम्ही मुंबईतील गणेशोत्सवात गणरायाचं दर्शन घेऊ अशी भूमिका नाशिकमधील मराठा आंदोलकांनी घेतली आहे. लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू सरकारने दडपशाही करू नये अशी प्रतिक्रिया यावेळी मराठा आंदोलकांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी केवळ मराठवाडामधील नाही तर मुंबई, पुणे आणि नाशिकमधील मराठा बांधव आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातूनही मराठा समाज आक्रमक
पुणे व पिंपरी चिंचवड मधील 14 तालुके मराठा बांधवांच्या आंदोलनासाठी संघटनात्मक तयारी पूर्ण करण्यात आली आहे मराठा समाजाच्या न्याय मागणीसाठी होणारे ऐतिहासिक आंदोलनात मावळ तालुक्यासह पुणे जिल्हा व शहर पिंपरी चिंचवड शहरातून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला जाणार आहे या पार्श्वभूमीवर व्यापक संघटना तयारी करण्यात आली असल्याची माहिती मराठा समाजाकडून देण्यात आली आहे.
मावळमधून संघटन व नियोजन
मावळ तालुक्यातून देखील प्रत्येक गावात वाडी व शहरामध्ये बैठक आयोजित करून संघटनात्मक जनजागृती करण्यात आली आहे आप आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी 100 चे दीडशे ॲम्बुलन्स तत्पर करण्यात आल्या आहेत. आंदोलनासाठी मावळ सह जिल्ह्यातून पाच ते दहा हजार स्वयंसेवकाची फौज सज्ज असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे