Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : प्रेमविवाहाच्या कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला; वडगाव मावळमध्ये आरोपींना अटक

Wadgaon Maval crime news : मावळ तालुक्यातील सांगवी येथील प्रेमविवाहातून झालेल्या हल्ला प्रकरणातील तिन्ही आरोपींना सोमवारी अखेर अटक करण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 08, 2025 | 03:30 PM
पत्नीसमोरच पतीची हत्या; चाकूने पोटावर केले सपासप वार अन्...

पत्नीसमोरच पतीची हत्या; चाकूने पोटावर केले सपासप वार अन्...

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : मावळमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. मागील एकाच आठवड्यामध्ये दोन खून झाले होते. यानंतर आता प्रेमविवाहाच्या कारणावरुन तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील सांगवी येथील प्रेमविवाहातून झालेल्या हल्ला प्रकरणातील तिन्ही आरोपींना सोमवारी अखेर अटक करण्यात आली. वडगाव मावळ पोलिसांनी ही कारवाई केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी याबाबत माहिती दिली.

सांगवी गावच्या हद्दीत अनुष्का हॉटेलजवळ ही धक्कादायक घटना घडली. 05 एप्रिल रोजी रात्री 08 वाजता ही घटमा घडली होती. प्रेमविवाह केलेल्या युवकावर त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांनीच प्राणघातक हल्ला केला होता. संकेत मारुती तोडकर (वय वर्षे 29, रा. तोडकर आळी, सांगवी) हे आपल्या चुलत भावासह स्कुटीवर बसून गावातील यात्रेच्या वर्गणीचा हिशोब करत असताना, शिवराज बंडू जाधव या आरोपीने आपल्या बहिणीशी झालेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून इतर दोन आरोपी यश अजय जाधव (वय वर्षे 22) आणि विशाल पाथरवट यांच्या मदतीने स्कुटीला मोटारसायकलने धडक दिली.

क्राईम न्यूज वाचण्यासाठी क्लिक करा

त्यानंतर तिघांनी मिळून कोयता, लोखंडी रॉडने संकेत तोडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात संकेत यांच्या उजव्या हाताचा दंड, खांदा आणि डोक्यावर गंभीर मारहाण करण्यात आली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणानंतर पोलीसांनी कडक कारवाई केली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

घरगुती वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून

घरगुती वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घरगुती वादातून पुतण्यासह एकाने चुलत्याच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.4) घडली.  दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास मावळ तालुक्यातील धामणे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ तालीम येथे घडली. शिरगाव परंदवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये महादेव भगवान गराडे (वय 73 रा. धामणे ता.मावळ) असे खून झालेल्या चुलत्याचे नाव आहे. तर मंगेश किसन गराडे (वय 38 रा.धामणे मावळ) व एक अनोळखी असे खुनातील आरोपी आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महादेव गराडे व आरोपी मंगेश गराडे यांच्यात घरगुती वाद होते. त्यातून आरोपी मंगेश गराडे व त्याच्या एका साथीदाराने मयत महादेव गराडे यांच्या मानेवर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.  मावळ तालुक्यात चार दिवसात दुसरा खून झाला असून नात्यातील व्यक्तीचा खून होत असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.

Web Title: Three accused in the attack case due to love marriage in sangvi arrested vadgaon maval crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • crime news
  • maval news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
1

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध; हरकती नोंदविण्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या आवाहन
2

वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध; हरकती नोंदविण्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या आवाहन

Maharashtra Rain Alert : पवना धरण परिसरात मुसळधार पाऊसाची जोरदार बॅटिंग; पवना धरण 100 टक्के भरले
3

Maharashtra Rain Alert : पवना धरण परिसरात मुसळधार पाऊसाची जोरदार बॅटिंग; पवना धरण 100 टक्के भरले

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…
4

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.