पुणे– मागील काही दिवसांपासून रस्ते अपघातात (Road Accident) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, पुणे-मुंबई महामार्गावर (Mumbai Pune Highway) अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज देखील पुणे-मुंबई महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. भरधाव मारुती कारने ट्रकला मागून धडक दिली. (Car and truck accident) या धडकेत कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. कारमधील दोघे जण जागीच ठार झाले, तर दोघे जण जखमी झाले. तर दुसरीकडे इनोव्हा-पीक अपची समोरासमोर धडक झाली. यात तीन जणांचा जागेवर मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळ नगर-कल्याण महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पुण्यात दोन वेगवेगळ्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (two different accident five dead)
कोकणातील कुटुंबावर काळाचा घाला…
कोकणातील दोन कुटुंब व्हॅगर कारने पुणे मार्गे मुंबईला येत होते. पण पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला. दरम्यान, अपघात एवढा मोठा होता की, दोनजण जागीच ठार झाले तर दोनजण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी सोमाटणे फाट्यावरील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जय सावंत आणि विकास सावंत अशी मयत दोघांची नावे आहेत. अश्विनी राणे आणि आर्या सावंत अशी जखमींची नावे आहेत. या अपघातामुळे काही वेळ पुणे मुंबई लेनवरील वाहतूक विस्कळीत होत, वाहतूक कोंडी झाली होती. (Pune-Mumbai highway, due to this)
या कारणामुळं झाला अपघात…
रात्रीची वेळ असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण गेले. त्यामुळे अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जुन्नर तालुक्यात हा भीषण अपघात घडला. नगर-कल्याण महामार्गावरील वाटखडे या गावाजवळ हा अपघात झाला. इनोव्हा गाडी चक्काचूर झाली आहे. इनोव्हा गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. इनोव्हा एमएच ०५-एएच ६३३७ मुंबईच्या दिशेने जात होती. पीक अप एमएच १४ जेडी ४०७४ कल्याणहून येत होती. या दोन्ही गाड्यांमध्ये हा अपघात झाला.