Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिबट्यांना रोखण्यास ‘थर्मल ड्रोन’ सह ५०० ट्रॅप कॅमेरे, संगमनेरमध्ये हायटेक यंत्रणेचा वापर

बिबट्यांची वाढती दहशत पाहता आता संगमनेरमध्ये ५०० ट्रॅप कॅमेरा बसविण्यात येणार आहेत आणि याशिवाय हायटेक यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. बिबट्यांना रोखण्यासाठी योजना

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 23, 2025 | 06:06 PM
बिबट्यांना पकडण्यासाठी संगमनेरमध्ये ट्रॅप (फोटो सौजन्य - iStock)

बिबट्यांना पकडण्यासाठी संगमनेरमध्ये ट्रॅप (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • २२ जानेवारीपर्यंत रस्ते व कालव्यांवरील अतिक्रमणे काढण्याच्या प्रशासनाला सूचना
  • मदतीसाठी रस्ते मोकळे ठेवण्याचे आवाहन 
  • संगमनेर तालुक्यात बिबट्यांची वाढती दहशत 
संगमनेर: तालुक्यातील विबट्यांचा वाढता वावर व मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांच्या पटना रोखण्यासाठी वन विभागाने ‘हायटेक’ यंत्रणेचा वापर करावा. ज्या भागात बिबट्यांची घनता जास्त आहे, तिथे धर्मल ड्रोन, नाईट व्हिजन कॅमेरे व ५०० हून अधिक ट्रॅप कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्‌याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुकल्या सिद्धेश सुरेश कडलग याच्या कुटुंबीयांची पालकमंत्री विखे पाटील यांनी आज निवासस्थानी जाऊन सांत्वनपुर भेट घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, उप वनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, उपविभागीय अधिकारी अरूण ठंडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे आदी उपस्थित होते.

सिद्धेशच्या कुटुंबीयांचे विखेंकडून सांत्वन

पालकमंत्री विखे पाटील यांनी मृत सिद्धेशचे आजोबा, आजी, वडील सुरेश कडलग व नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही घटना अत्यंत वेदनादायी असून शासन या दुःखद प्रसंगी पूर्णपणे कडलग कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत व वन विभागाचे लाभ तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. बिबट्‌या प्रवण क्षेत्रात प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजने बाचत बोलताना श्री. विखे पाटील म्हणाले, वन विभागाच्या ताफ्यात नव्याने २२ गस्ती वाहने व ५ नवीन गन (बंदुका) दाखल होत आहेत. ही मोहीम पुढील ४ ते ६ महिने प्रभावीपणे राबविण्यात येईल. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला.

‘या’ गावात कुत्रा, मांजरी नाही तर बिबट्याला पाळतात, असं एक गाव जिथे बिबट्या आणि माणसं एकत्र राहतात

मदतीसाठी रस्ते मोकळे असणे अत्यावश्यक

बिबट्याच्या हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवण्यासाठी रस्ते मोकळे असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कालव्यांच्या कडेला व वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे कड़क आदेश पालकमंत्र्यांनी दिले, हे रस्ते सार्वजनिक हिताचे असल्याने प्रसंगी पोलीस बळाचा वापर करून, येत्या २२ जानेवारीपर्यंत रस्ते मोकळे करावेत व त्यांचे मुरमीकरण करून ते वाहतुकीयोग्य करावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. 

मुलांच्या सुरक्षेसाठी लोकसहभागाची गरज

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांच्या संरक्षक भिंतींची उंची वाढविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र, वाड्या-वस्त्यांवरून येणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून पुढाकार घेण्याचे आवाहन विखे यांनी केले, रोटेशन पद्धतीने ट्रॅक्टर किंवा सुरक्षित वाहनांची व्यवस्था करून मुलांना शाळेत सोडणे व आणणे ही पद्धत अवलंबिल्यास विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Leopard News: मिरजोळेत वाढली बिबट्याची दहशत; जंगलात चरण्यासाठी गेलेल्या एका…

‘रेसक्यू सेंटर’ची संकल्पना मांडली

यावेळी वन संवर्धन व पर्यटनाला चालना देण्यासाठी गोरक्षनाथ गड परिसरातील वन विभागाच्या २०० २५० एकर जमिनीवर बिबट्यांसाठी ‘रेसक्यू सेंटर’ विकसित करण्याच संकल्पना पालकमंत्र्यांनी मांडली. ही जागा वन विभागाकडे हस्तांतरित करून तिथे निसर्ग संवर्धनाचे राबविण्याबाचत सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, बन विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: To stop leopards 500 trap cameras along with thermal drones are being used high tech systems are being employed in sangamner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Leopard
  • Leopard caught

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: कर्जतमध्ये वाळू तस्करांची थेट अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी
1

Ahilyanagar News: कर्जतमध्ये वाळू तस्करांची थेट अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी

Ahilyanagar :  जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र
2

Ahilyanagar : जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

बिबट्याची आता खैर नाही! संगमनेरमध्ये घुमतोय ‘कार्बाइड गन’ चा आवाज, ग्रामीण भागात सर्रास वापर
3

बिबट्याची आता खैर नाही! संगमनेरमध्ये घुमतोय ‘कार्बाइड गन’ चा आवाज, ग्रामीण भागात सर्रास वापर

Ahilyanagar News: जेऊरमध्ये ग्रामस्थांवर जोरदार दगडफेक! नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
4

Ahilyanagar News: जेऊरमध्ये ग्रामस्थांवर जोरदार दगडफेक! नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.