राजस्थानमध्ये अरावली पर्वतात वसलेलं बेडा हे गाव खास बिबट्यांसाठी ओळखलं जातं. या गावात बिबट्या रानावनात किंवा घनदाट अभयारण्यात नाही तर माणसांच्या वस्तीत आणि गावात यांचा मुक्त संचार असतो. बिबट्याचा हा संचार आता आताचा नव्हे तर तो कित्येक पिढ्यांचा आहे. बिबट्या इथल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग राहिले आहेत.
विशेष म्हणजे,गेले कित्येक दशकांपासून इथे बिबट्या हल्यात एकही मानवी मृत्यूची नोंद नाही. यागावात बिबटे मंदिरांच्या गुहांजवळ दिसतात, तेव्हा स्थानिक लोक त्यांना जमिनीचे रक्षक म्हणून त्यांचा आदर करतात. त्यांना मान देतात. एवढंच नाही तर देवाचं रुप मानून त्यांचा आशीर्वाद घेतात. या गावातल्या रबारी समाजाने पिढ्यानपिढ्या बिबट्याशी असलेलं नातं जपलं आहे. या समाजाची माणसं बिबट्याच्या हल्ल्यामुळे गुरांचं झालेलं नुकसान देखील सहन करतात.
अरवलीच्या टेकड्यांमध्ये वसलेलं ‘बेडा’ खास बिबट्यांसाठी ओळखलं जातं. जिथे 50 हून अधिक बिबटे जंगलात नाही, तर घरांमध्ये, मंदिरांमध्ये आणि शेतांमध्ये मोकळेपणाने वावरतात. यांचा वावर मुक्त असून ना कोणती कुपणं, न कोणती भीती असते. रबारी समाजाकडून बिबट्यांना कोणताही दगाफटका होत नाही, तर ही माणसं बिबट्यांना जमिनीचे रक्षक मानतो.
इथली जमीन आणि भौगोलिक वातावरण बिबट्यांसाठी अनुकूल आहे. खडकाळ टेकड्या आणि नैसर्गिक गुहा यांमुळे बिबट्यांचं प्रमाण अधिक आहे. याचबरोबर या बिबट्यांसाठी आजूबाजूला आढळणारे वन्य शिकार अन्न पुरवतात. इथली जमीन आणि वातावरण देखील बिबट्यांसाठी अनुकूल आहे, खडकाळ टेकड्या आणि नैसर्गिक गुहा घर देतात, आणि आजूबाजूला आढळणारे वन्य शिकार त्यांना अन्न पुरवतात.बेडा गाव आता Eco-tourism चे केंद्र बनले आहे, जिथे लोक बिबट्यांना पाहण्यासाठी येतात, पण परत जाताना माणूस आणि निसर्ग यांच्यातील नात्याने प्रेरित होऊन जातात.बेडा गावात बिबट्या आणि माणसांचं एकत्र राहणं ही त्यांच्या जीवनशैलीचा एक सहज भाग आहे. असं हे बेडा गाव जिथे बिबट्याला परमेश्वराचं रुप मानलं जातं आणि गावकरी या बिबट्यांना अभय देतात.
Ans: कारण या गावात बिबट्या जंगलापुरते मर्यादित नसून थेट गावात, मंदिरांजवळ, शेतात आणि घरांच्या आसपास मुक्तपणे फिरतात.
Ans: बेडा गावात बिबट्यांचा वावर अनेक पिढ्यांपासून आहे. हा सहवास अचानक निर्माण झालेला नसून पारंपरिक आणि नैसर्गिक आहे.
Ans: बेडा हे गाव राजस्थान राज्यात अरावली पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. हे गाव विशेषतः बिबट्यांच्या मुक्त वावरासाठी ओळखले जाते.






