Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabaleshwar Rain Record: महाबळेश्वरमध्ये पावसाचा हाहा:कार, २४ तासांत तब्बल २० इंच पाऊस; जुने सर्व रेकॉर्ड मोडीत

महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत विक्रमी २० इंच (५१३ मिमी) पाऊस झाला आहे. वेण्णा नदीचा पूल खचल्याने ३ वाहने नदीत कोसळली, तर अनेक गावांचा संपर्क तुटला असून संपूर्ण तालुक्याची वीज गूल झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 06, 2026 | 09:35 PM
Mahabaleshwar Rain Record: महाबळेश्वरमध्ये पावसाचा हाहा:कार, २४ तासांत तब्बल २० इंच पाऊस; जुने सर्व रेकॉर्ड मोडीत
Follow Us
Follow Us:
  • महाबळेश्वरमध्ये पावसाचा कहर!
  • २४ तासांत तब्बल २० इंच पाऊस
  • जुने सर्व रेकॉर्ड मोडीत
महाबळेश्वर: महाबळेश्वर आणि मुसळधार पाऊस याचे समीकरण किती घट्ट आहे, याचा प्रत्यय गेल्या ५ ते ६ दिवसांपासून अवघ्या महाबळेश्वरला येत आहे. वरुणराजाने जणू काही महाबळेश्वर आणि परिसराला अक्षरशः झोडपून काढले असून, पावसाची ही ‘धुंवाधार बॅटिंग’ थांबायचे नाव घेत नाहीये. कोसळणारा पाऊस पाहून सध्या सर्वत्र पावसाचा हाहाकार माजला आहे.

यावर्षी पावसाने एकाच दिवसात तब्बल २० इंच पाऊस पडून आपलेच जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. निसर्गाचे हे रौद्ररूप रोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. रविवार सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अवघ्या २४ तासांत ५१३ मि.मी. (२० इंच) पावसाची नोंद झाली असून, हे या वर्षातले सर्वात भीतीदायक आणि नवे रेकॉर्ड ठरले आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ जूनपासून आज अखेरपर्यंत महाबळेश्वर परिसरात तब्बल १७२७.४० मि.मी. (६७ इंच) इतका आज पर्यंत पाऊस झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे महाबळेश्वर परिसरातील जनजीवन पूर्णतः कोलमडून गेले आहे. या पावसाने केवळ शहरालाच नाही, तर ग्रामीण भागालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. वेण्णा लेकजवळील री जंठाकडे जाणाऱ्या वेण्णा नदीवरचा लोखंडी पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे खचला. यामुळे पुलावर उभी असलेली तीन वाहने थेट नदीपात्रात कोसळली सुदैवाने घटनेची माहिती मिळताच नगरपालिका प्रशासनाने तातडीने धाव घेतली आणि युद्धपातळीवर प्रयत्न करून ही वाहने नदीपात्रातून क्रेन द्वारे बाहेर काढली.

प्रशासनाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेण्णा लेक आणि महाबळेश्वरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. या जलमय रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांना शरथीचे प्रयत्न करावे लागत होते . महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावरील बगीचा कॉर्नर नजीक पाणी आल्याने वाहतूक मंदावली होती त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.

ग्रामीण भागाची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक वाड्या-वस्त्यांचे रस्ते खचले असून, महाकाय झाडे कोलमडून पडली आहेत मातीचे लोट व दगडी रस्त्यावर आली असल्याने घाट रस्ते बंद झाले आहेत. घावरी-येरणे रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोळशी नदीला आलेल्या पुरामुळे येरणे खुर्द, येरणे बुद्रुक, आणि आचली या गावांचा असलेला संपर्क पूर्णतः तुटला आहे. दळणवळणाची सर्व साधने बंद पडली आहेत.

महाभयंकर संकट? Pune शहराला मुसळधार पावसाचा इशारा; सिंहगड किल्ला बंद अन् खडकवासला धरण…

महाबळेश्वर-प्रतापगड रोडवरील हारोशी गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या छोट्या जन्नी माता मंदिर परिसराजवळील रस्ता घाटा च्या कडेला खचला आहे. ज्यामुळे या संपूर्ण रोडला मोठा धोका निर्माण झाला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे संपूर्ण तालुक्याचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज नसल्यामुळे गावागावांतील पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. परिणामी, चहूबाजूला पाण्याचे साम्राज्य असतानाही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

रात्रीच्या वेळी गावागावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरत असून, मोबाईल आणि इंटरनेट सुविधा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत एखादी वैद्यकीय किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर प्रशासनाशी संपर्क कसा करायचा? हा प्रश्न आता इथल्या जनतेला सतावत आहे. सुरुवातीला शेतकरी राजा या पावसाने सुखावला होता, समाधानी झाला होता. मात्र, आता रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा वीज, पाणी, मोबाईल नेटवर्क सर्व काही बंद झाल्याने ग्रामीण जनतेचे जगणे अत्यंत कठीन झाले आहे. प्रशासनाने या सुविधा लवकरात लवकर पूर्ववत कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

तालुक्यातील मोरणी येथे एक महाकाय वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. गावातील तरुण कार्यकर्ते आणि स्थानिक लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून, पाऊस-वाऱ्याची पर्वा न करता रस्ता मोकळा करण्यासाठी झाड हटवण्याचे काम करत आहेत. मात्र, अशा वेळी संवेदनशील राहण्याऐवजी वन विभाग मात्र आपला अडमुठेपणा दाखवत आहे. त्यांच्या या जाचक नियमांमुळे आणि असहकार्यामुळे मदतकार्यात नाहक विलंब होत असून, स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाबळेश्वर चे तहसीलदार सचिन म्हस्के, नगरध्यक्ष सुनील शिंदे मुख्याधिकारी योगेश पाटील, यांनी जनतेला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

पावसाचा तडाखा कायम; घाटमाथ्यातील सहा तालुक्यांतील शाळांना सुट्टी, उर्वरित जिल्ह्यात वर्ग नियमित

Web Title: Torrential rain wreaks havoc in mahabaleshwar a staggering 20 inches of rainfall in 24 hours all previous records shattered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • Mahabaleshwar
  • Maharashtra Rain
  • mansoon
  • Rain News

संबंधित बातम्या

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
1

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…
2

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…

Maharashtra Breaking News Today 2026:  होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’, तेलाची बाजारात निर्यात
3

Maharashtra Breaking News Today 2026: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’, तेलाची बाजारात निर्यात

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…
4

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.