Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंहगडावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, अनेक जण जखमी

सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. मधमाशांच्या हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. गडावरील पुणे दरवाजा पासून पुढे मधमाशा घोंगावत असताना पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने मात्र कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसून आल्या नाहीत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 19, 2023 | 12:32 PM
सिंहगडावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, अनेक जण जखमी
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. मधमाशांच्या हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. गडावरील पुणे दरवाजा पासून पुढे मधमाशा घोंगावत असताना पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने मात्र कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसून आल्या नाहीत.

रविवारची सुट्टी असल्याने सकाळपासूनच सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. वाहनतळ पूर्ण भरून घाटरस्त्यावर एक किलोमीटर पेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गाडीतळापासून पुणे दरवाजापर्यंत व गडावरील पायवाटांवर दाटीवाटीने पर्यटक चालताना दिसत असतानाच टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. सकाळपासून सातत्याने या परिसरात मधमाशा घोंगावत असताना पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने योग्य खबरदारी न घेतल्याने अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.

दोन मुलींच्या शरीरावर चिपकल्या मधमाशा

दोन मुली मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडत होत्या. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मधमाशा चिकटलेल्या होत्या. त्या वाचवा वाचवा म्हणून किंचाळत होत्या. परंतु भीतीमुळे सर्वजण आपापला जीव वाचवून पळत होते. हॉटेल चालकांनी धूर करुन मधमाशांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या मुलींपासून धूर लांब असल्याने उपयोग होत नव्हता. असं एका पर्यटकांने सांगितलं.

मधमाशा दिसल्याने पर्यटक पळाले

अचानक मधमाशा दिसल्याने आम्ही पळालो. हजारो पर्यटक गडावर होते. जर मोठ्या प्रमाणात मधमाशांनी हल्ला केला तर लोक पळणार तरी कोठे? संबंधितांनी याबाबत काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं एका पर्यटकाने म्हटलं.

कोणतीही व्यवस्था सिंहगडावर नाही

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणतीही व्यवस्था नाही. सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी सरासरी पाच ते दहा हजार पर्यटक येतात. मधमाशांचा हल्ला, दरड कोसळणे किंवा इतर दुर्घटना घडतात. त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांचा जीव वाचविण्यासाठी कोणतीही व्यवस्था सिंहगडावर नाही. जखमींना त्वरित उपचारांसाठी घेऊन जाण्यासाठी साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध नसते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन सिंहगडावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवप्रेमी आणि पर्यटकांकडून होत आहे.

Web Title: Tourists at sinhagad were attacked by bees many injured nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2023 | 12:32 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • NAVARASHTRA
  • Pune
  • Sinhgad
  • Sudhir Mungantiwar

संबंधित बातम्या

Ganesh Festival: स्विगीचा अनोखा उपक्रम, GSB आणि श्रीमंत दगडूशेठसह भागीदारी; 1 रूपयात प्रसाद वितरण
1

Ganesh Festival: स्विगीचा अनोखा उपक्रम, GSB आणि श्रीमंत दगडूशेठसह भागीदारी; 1 रूपयात प्रसाद वितरण

पुणेकरांना दिलासा! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘या’ बहुचर्चित उड्डाणपुलाचे लोकार्पण, वाहतूक कोंडीतून…
2

पुणेकरांना दिलासा! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘या’ बहुचर्चित उड्डाणपुलाचे लोकार्पण, वाहतूक कोंडीतून…

Fadnavis On Maratha Reservation: मराठा आंदोलनाबाबत हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश; फडणवीस म्हणाले, “ज्या गोष्टी …”
3

Fadnavis On Maratha Reservation: मराठा आंदोलनाबाबत हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश; फडणवीस म्हणाले, “ज्या गोष्टी …”

Puneet Balan: पुण्यातील गणेशोत्सवात ‘हक्काचा माणूस’ पुनीत बालन यांची चर्चा का?
4

Puneet Balan: पुण्यातील गणेशोत्सवात ‘हक्काचा माणूस’ पुनीत बालन यांची चर्चा का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.