Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST च्या सर्व बस होणार इलेक्ट्रिक…; 10 वर्षात जुन्या बस जाणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीमधील सर्व बस या इलेक्ट्रिक करण्यात येणार आहे. तसेच पुढील 10 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व जुन्या बस बंद केल्या जाणार असल्याची माहिती दिली आहे. 

  • By प्रीति माने
Updated On: Jun 11, 2025 | 03:43 PM
Pratap Sarnaik announced that all ST buses will be electric

Pratap Sarnaik announced that all ST buses will be electric

Follow Us
Follow Us:

पुणे : महाराष्ट्रातील प्रवाशामध्ये लालपरी ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. गावागावांमधील प्रवासासाठी सर्वजण एसटी बसचा पर्याय निवडतात. गावामधील शाळा व कॉलेजमध्ये जाण्यासाठी एसटीचा वापर केला जातो. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी बसबाबत मोठी घोषणा केली आहे. प्रताप सरनाईक हे पुण्यामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी एसटीमधील सर्व बस या इलेक्ट्रिक करण्यात येणार आहे. तसेच पुढील 10 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व जुन्या बस बंद केल्या जाणार असल्याची माहिती दिली आहे.

राज्यातील सर्व एसटी बस आणि डेपो अद्ययावत करण्याचे सरकारने हाती घेतले आहे. पुढील दोन महिन्यात काम सुरू होणार असून सुरक्षा आणि स्वच्छता याचा विचार करून काम केले जाईल, असे आश्वासन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले. एसटी खात्यात 5 हजार बस घेणार असू तर त्यापैकी एक हजार बस या इलेक्ट्रिक घेण्याचे संकेत त्यांनी दिले. पुढील काही वर्षात एसटीच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक असतील. 2029 पर्यंत ताफ्यात 25 हजार बसेस दाखल होणार आहेत, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून एसटी महामंडळाचे पुढील पूर्ण नियोजन सांगितले आहे. पुढे ते म्हणाले की, सरनाईक यांनी या स्मार्ट बसमध्ये सर्व आवश्यक सेवा-सुविधा आणि सुरक्षितता यंत्रणा असतील असे स्पष्ट केले स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर, बाहेरील व्यक्ती बसमध्ये सहजपणे प्रवेश करू शकणार नाहीत, अशी यंत्रणा बसमध्ये असावी. तसेच आग किंवा इतर घटना घडल्यास तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा बसमध्ये असणे आवश्यक असल्याचेही देखील मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

हळूहळू सुधारणा होतील

प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळाला सध्या ११ हजार कोटींचा संचित तोटा असून, यावर श्वेतपत्रिका काढणार आहे. जुन्या चुका सुधारून नव्या पद्धतीने काम सुरू केले जाईल, मात्र या सुधारणा लगेच न होता, पुढील अडीच वर्षात हळूहळू होतील अशी भूमिका प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. तसेच यापुढे बसेस लिझवर न देता, काही ठिकाणी त्या तयार करून घेतल्या जातील आणि त्यांची मालकी एसटी महामंडळाकडेच राहील, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

विभागाला निधी देण्यावरुन शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे तक्रार करत आहेत. तर दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांच्या निधी देण्यावरुन कौतुक केले. परिवहन खात्याला अजित पवार सढळ हाताने निधी देत आहेत. महायुतीत कोणतीही नाराजी नाही, असं प्रताप सरनाईकांनी सांगितलय, कदाचित मी जुना सहकारी असल्याने निधीची अडचण येत नाही. इतर खात्यांबद्दल मला माहिती नाही, असं त्यांनी स्पष्ट केले. महायुतीत कोणतीही नाराजी नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीचा निर्णय हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, असे मत प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Transport minister pratap sarnaik announced all st buses will electric and old buses retired in 10 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • pratap sarnaik
  • pune news
  • st bus news

संबंधित बातम्या

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?
1

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
2

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
3

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
4

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.