Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उभारून प्रवाशांना…”; प्रताप सरनाईक यांची पाली बसस्थानकाला भेट

बसस्थानकाच्या जागेवर कोणतेही अतिक्रमण अथवा न्यायप्रविष्ट प्रकरण नसल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीस कोणताही अडथळा नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 30, 2026 | 08:10 PM
“सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उभारून प्रवाशांना…”; प्रताप सरनाईक यांची पाली बसस्थानकाला भेट
Follow Us
Follow Us:

प्रताप सरनाईक यांची पाली बसस्थानकाला अचानक भेट
आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उभारण्याचा निर्धार
प्रताप सरनाईक यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना 

पाली: राज्यातील एसटी प्रवाशांना अधिक दर्जेदार व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रा.प. पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

पाली येथील बसस्थानकासाठी सुमारे १५ हजार ७५७ चौ.मी. क्षेत्रफळाची जागा सन १९७१ मध्ये संपादित करण्यात आली होती. या जागेवर सन १९७८ मध्ये बसस्थानकाची इमारत उभारण्यात आली होती. कालबाह्य झालेली जुनी इमारत सन २०२२ मध्ये पाडण्यात आल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज नवीन बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून रु. १३ कोटी ९६ लाख ४४ हजार ३४६ इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. बसस्थानकाच्या जागेवर कोणतेही अतिक्रमण अथवा न्यायप्रविष्ट प्रकरण नसल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीस कोणताही अडथळा नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

🗓️ ३० मे २०२६ | 📍 पाली पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची पाहणी आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उभारण्याचा निर्धार राज्यातील एसटी प्रवाशांना अधिक दर्जेदार व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची आज पाहणी केली.… pic.twitter.com/FCk8vA2mjJ — Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) May 30, 2026

नवीन बसस्थानकात ८ फलाटांचे सुसज्ज बसस्थानक, प्रशस्त प्रतीक्षालय, स्वतंत्र कँटीन, विद्यार्थी पासधारक व आरक्षणधारकांसाठी विशेष सुविधा, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, चालक-वाहकांसाठी विश्रामगृह, चौकशी कार्यालय, प्रशासकीय कार्यालये, दुकाने, उपहारगृह तसेच इतर विविध प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष बांधकाम कार्यास गती देण्यात येणार आहे.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “पाली हे महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन केंद्र असून येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक आणि प्रवासी येत असतात. त्यामुळे आधुनिक, स्वच्छ व सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उभारून प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे स्वरूप प्राप्त होईल आणि प्रवाशांच्या सोयींमध्ये मोठी भर पडेल.”

बारामती बसस्थानकाचा राज्यात डंका! ‘अ’ वर्गात प्रथम क्रमांक, मिळाले १ कोटींचे पारितोषिक

मंत्री प्रताप सरनाईक यांनी लोकांच्या मागणीचे निवेदनावर लगेच कारवाई होण्यासाठी एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधून कल्याण- पाली ही बस लवकर सुरू करण्याची निर्देशित केले. तसेच पाली – खोपोली मार्गावर शटल सेवेच्या फेऱ्या वाढविण्यासाठी नव्या बसेस देण्याची देखील सूचना केल्या.

 

Web Title: Transport minister pratap sarnaik inspects pali bus stand redevelopment project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Bus Stand
  • msrtc
  • Pratap Sarnaiik

संबंधित बातम्या

ST Employees: अतिवृष्टीमुळे गैरहजर ST कर्मचाऱ्यांना विशेष रजा द्या; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी
1

ST Employees: अतिवृष्टीमुळे गैरहजर ST कर्मचाऱ्यांना विशेष रजा द्या; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी

MSRTC toll tax : राज्याची टोलमाफी, पण केंद्राच्या टोल नाक्यांवर एसटीला दिलासा नाही; सहा महिन्यांत ५.८१ कोटींचा अतिरिक्त भार
2

MSRTC toll tax : राज्याची टोलमाफी, पण केंद्राच्या टोल नाक्यांवर एसटीला दिलासा नाही; सहा महिन्यांत ५.८१ कोटींचा अतिरिक्त भार

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
3

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.