Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! थकीत देणी देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार

ST Employees: एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या थकीत देणी आणि प्रलंबित आर्थिक प्रश्नांबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. कर्मचाऱ्यांची थकीत देणी भागविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 30, 2026 | 11:08 AM
एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! थकीत देणी देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! थकीत देणी देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार

Follow Us
Follow Us:
  • एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देण्यांचा प्रश्न मार्गी लागणार
  • मुख्यमंत्र्यांनी दिले निधीचे आश्वासन
 

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांची थकीत देणी भागविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी शुक्रवारी दिली.(ST Employees)

एसटी कर्मचाऱ्यांची वेतनविषयक देणी, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), उपदान (ग्रॅच्युइटी) आणि अन्य थकबाकी प्रलंबित असताना दिवाळीपूर्वी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात सरकारकडून विलंब होत असल्याचे निवेदन मुख्यंत्र्यांना देण्यात आल्याचे बरगे यांनी सांगितले. बरगे यांनी गुरुवारी (29 ऑक्टोबर 2026) रात्री दादर येथील कार्यक्रमा दरम्यान फडणवीस यांची भेट घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देण्यांसंदर्भात व्यथा मांडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले असल्याचे श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

ST Bus Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर

एसटी महामंडळाने ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि अन्य थकीत देणी भागविण्यासाठी राज्य सरकारकडे १३५४. ५४ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात ३९१ कोटी रुपयेच उपलब्ध करून देण्यात आल्याने महामंडळाच्या आर्थिक अडचणी वाढल्याचा दावा बरगे यांनी केला. कर्मचाऱ्यांची गेल्या दोन ते तीन वर्षांतील ५,७४० कोटी रुपयांहून अधिक देणी प्रलंबित आहेत. यामध्ये भविष्य निर्वाह निधी आणि उपदानापोटी संबंधित विश्वस्त मंडळाकडे जमा न झालेल्या सुमारे ३,३५० कोटी रुपयांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

वेतनवाढीच्या फरकापोटी सरकारने ५९७.१२ कोटी रुपये मंजूर केले असले, तरी ही रक्कम प्रत्यक्षात महामंडळाला मिळालेली नसल्याचे बरगे यांनी म्हटले आहे. एसटीचा संचित तोटा वाढत असताना अपेक्षित प्रवासी उत्पन्न मिळत नसल्याने महामंडळाला दैनंदिन आर्थिक व्यवहार सांभाळणे कठीण होत आहे. त्यातच कर्मचाऱ्यांची वेतनविषयक देणी, पीएफ, ग्रॅच्युइटी आणि अन्य देयकांची थकबाकी वाढत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. या सर्व बाबींवर आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आश्वासन दिल्याचे बरगे यांनी सांगितले. यावेळी राहुल माने, अमोल पोळ, अमृत पवार, औदुंबर कुंभारकर आदी उपस्थित होते.

या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांची थकीत देणी अदा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलले जाण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार आणि किती निधी उपलब्ध करून दिला जाणार, याकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांच्या निधीवरून राजकीय संघर्ष; अजित पवारांचे कौतुक, फडणवीसांवर बरगेंचा निशाणा

💡

Frequently Asked Questions

  • Que: एसटी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे?

    Ans: एसटी कर्मचाऱ्यांची थकीत देणी भागविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

  • Que: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचा एसटी कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार आहे?

    Ans: थकीत देणी मिळाल्यास एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

  • Que: एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत देणी भागविण्यासाठी काय केले जाणार आहे?

    Ans: थकीत देणी अदा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Cm assures funds to clear pending dues of st msrtc employees sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • msrtc
  • Shrirang Barge
  • st bus
  • ST Employees

संबंधित बातम्या

NCMC Card Registration: महिलांनो, NCMC कार्ड नोंदणी करा अन्यथा…; एसटी महामंडळाचे निर्देश
1

NCMC Card Registration: महिलांनो, NCMC कार्ड नोंदणी करा अन्यथा…; एसटी महामंडळाचे निर्देश

Dharashiv Bus Stand: धाराशिव बसस्थानकात अतिक्रमणाला अधिकाऱ्यांचे अभय? महिला स्वच्छतागृहाचे व्हेंटिलेशन बंद
2

Dharashiv Bus Stand: धाराशिव बसस्थानकात अतिक्रमणाला अधिकाऱ्यांचे अभय? महिला स्वच्छतागृहाचे व्हेंटिलेशन बंद

ST Bus Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर
3

ST Bus Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांच्या निधीवरून राजकीय संघर्ष; अजित पवारांचे कौतुक, फडणवीसांवर बरगेंचा निशाणा
4

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांच्या निधीवरून राजकीय संघर्ष; अजित पवारांचे कौतुक, फडणवीसांवर बरगेंचा निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.