Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC : ऐन दिवाळीत एसटी बसची चाके थांबणार? कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यभर घंटानाद, निदर्शने अन् बेमुदत धरणे

MSRTC: ऐन दिवाळीत एसटी बसची चाके थांबण्याची शक्यता आहे, कारण महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक आणि अन्य न्याय्य मागण्यांसाठी ३ नोव्हेंबर २०२६ पासून राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 02, 2026 | 04:27 PM
ऐन दिवाळीत एसटी बसची चाके थांबणार? कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यभर घंटानाद, निदर्शने अन् बेमुदत धरणे

ऐन दिवाळीत एसटी बसची चाके थांबणार? कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यभर घंटानाद, निदर्शने अन् बेमुदत धरणे

Follow Us
Follow Us:
  • एसटी कर्मचाऱ्यांचा ३ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार
  • ५ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे
  • ३ नोव्हेंबरला घंटानाद
MSRTC : अवघ्या दोन दिवसावर दिवाळी सण येऊन ठेपला असतान, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक आणि अन्य न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. ३ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणारे हे आंदोलन तीन टप्प्यांत करण्यात येणार असून, मागण्यांची पूर्तता होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये या आंदोलनाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली असून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांसह अन्य न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने आंदोलनाचे नियोजन केले आहे.

Pratap Sarnaik: रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल! सासवडमध्ये देशातील पहिले अत्याधुनिक रस्ते सुरक्षा केंद्र उभारणार

तीन टप्प्यांत होणार आंदोलन

या आंदोलनाची सुरुवात ३ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. पहिल्या दिवशी राज्यभरातील सर्व एसटी आगारांमध्ये घंटानाद आणि तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येईल.

४ नोव्हेंबर रोजी आंदोलनाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. या दिवशी राज्यभरातील एसटी आगारांमध्ये भव्य द्वारसभा आणि तीव्र निदर्शने आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडण्यात येणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यात ५ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

मुंबई सेंट्रल येथे भव्य घंटानाद आणि द्वारसभा

राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सेंट्रल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर भव्य घंटानाद, तीव्र निदर्शने आणि द्वारसभा आयोजित करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या आणि अन्य न्याय्य प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांच्या लढ्याला माध्यमांनी साथ द्यावी आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

राज्यभरातील एसटी आगारांमध्ये होणाऱ्या या आंदोलनामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. मात्र, आंदोलनामुळे एसटी बससेवेवर नेमका काय परिणाम होणार आहे, याबाबत संघटनेच्या निवेदनात स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

मोशीच्या कचरा प्रश्नावर महापालिकेसह राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार; आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन

💡

Frequently Asked Questions

  • Que: एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन कधी सुरू होणार आहे?

    Ans: महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने ३ नोव्हेंबर २०२६ पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.

  • Que: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे तीन टप्पे कोणते आहेत?

    Ans: ३ नोव्हेंबरला घंटानाद व तीव्र निदर्शने, ४ नोव्हेंबरला भव्य द्वारसभा व निदर्शने आणि ५ नोव्हेंबरपासून मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन असे तीन टप्पे आहेत.

  • Que: मुंबई सेंट्रल येथे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन कुठे आणि किती वाजता होणार आहे?

    Ans: ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता मुंबई सेंट्रल येथील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर घंटानाद, तीव्र निदर्शने आणि द्वारसभा आयोजित करण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra st workers union three phase protest pending demands november 2026 sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • msrtc
  • ST workers protest

संबंधित बातम्या

ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! थकीत देणी देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार
1

ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! थकीत देणी देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार

NCMC Card Registration: महिलांनो, NCMC कार्ड नोंदणी करा अन्यथा…; एसटी महामंडळाचे निर्देश
2

NCMC Card Registration: महिलांनो, NCMC कार्ड नोंदणी करा अन्यथा…; एसटी महामंडळाचे निर्देश

Dharashiv Bus Stand: धाराशिव बसस्थानकात अतिक्रमणाला अधिकाऱ्यांचे अभय? महिला स्वच्छतागृहाचे व्हेंटिलेशन बंद
3

Dharashiv Bus Stand: धाराशिव बसस्थानकात अतिक्रमणाला अधिकाऱ्यांचे अभय? महिला स्वच्छतागृहाचे व्हेंटिलेशन बंद

ST Bus Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर
4

ST Bus Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.