Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik On ST: एसटी प्रवाशांची लूट खपवून घेणार नाही! एनसीएमसी कार्ड जादा दराने विकल्यास विक्रेत्याचा परवाना रद्द

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या घेणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एनसीएमसी कार्ड हे कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 06, 2026 | 04:30 PM
MSRTC News, NCMC Card, Pratap Sarnaik, ST Smart Card,

MSRTC News, NCMC Card, Pratap Sarnaik, ST Smart Card,

Follow Us
Close
Follow Us:
  • नवीन कार्डसाठी १९९ रुपये आणि जुन्या स्मार्ट कार्डधारकांसाठी १४९ रुपये
  • जादा दर आकारणाऱ्या ३००० हून अधिक विक्रेत्यांपैकी दोषींचे परवाने तात्काळ रद्द
  • सवलतींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड ही प्रणाली लागू केली आहे
Pratap Sarnaik on ST: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) वतीने सवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे.यासाठी राज्यभरात तीन हजारांहून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही हे कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहेत.नवीन एनसीएमसी कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.

मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.यामुळे अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील,असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

Wai News: पाचगणीच्या वैभवाला अस्वच्छतेचा डाग! बाजारपेठेतील शौचालयांची दुरवस्था; पर्यटकांची मोठी

दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या घेणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एनसीएमसी कार्ड हे कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. महामंडळाच्या सूचनेनुसार, लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान एनसीएमसी कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे.

Eknath Shinde Shivsena News: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बडा नेता साथ सोडण्याच्या तयारीत

त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच सवलतींचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे.तसेच, एनसीएमसी कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.सर्व आगार व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

 

Web Title: Transport minister pratap sarnaik warns ncmc card vendors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Maharashtra ST Buses
  • Marathi News
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

आर्थिक नियोजनात महिलांचा टक्का वाढला! Bandhan Life च्या पॉलिसीधारकांमध्ये 35 टक्क्यांची मोठी झेप
1

आर्थिक नियोजनात महिलांचा टक्का वाढला! Bandhan Life च्या पॉलिसीधारकांमध्ये 35 टक्क्यांची मोठी झेप

तंत्रज्ञान क्षेत्रात HP चा धमाका! भारतात 20 हून अधिक नवीन AI उत्पादने लाँच
2

तंत्रज्ञान क्षेत्रात HP चा धमाका! भारतात 20 हून अधिक नवीन AI उत्पादने लाँच

Abakkus म्युच्युअल फंडाने 5000 कोटींचा AUM टप्पा केला पार; अल्पावधीत जोडले 1 लाख गुंतवणूकदार
3

Abakkus म्युच्युअल फंडाने 5000 कोटींचा AUM टप्पा केला पार; अल्पावधीत जोडले 1 लाख गुंतवणूकदार

Ghabadkund Movie : भल्या-भल्यांना घाम फोडणारी रंगी येतेय! ‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटेची काळजाचा ठोका चुकवणारी भूमिका
4

Ghabadkund Movie : भल्या-भल्यांना घाम फोडणारी रंगी येतेय! ‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटेची काळजाचा ठोका चुकवणारी भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.