Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अन्न आणि औषध सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा पदभार सांभाळत असताना त्यांना कोणकोणती कार्ये करावी लागतात आणि कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, ते आज इथे पाहूयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 31, 2026 | 04:21 PM
FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे राज्यभरातील भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
  • हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि औषध कंपन्यांच्या अचानक तपासणी मोहिमेमुळे उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
  • नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कायदेशीर बडगा उगारत FDAने कडक व पारदर्शक प्रशासकीय कारवाईचा बस्ता बांधला आहे.

महाराष्ट्राचे अत्यंत कडक, कर्तव्यकठोर आणि धडाडीचे IAS अधिकारी  म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे म्हणजेच FDA चे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून या विभागाने एक नवीन आणि आक्रमक रूप धारण केले आहे. सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ करणाऱ्यांवर आणि नियम पाळत नसलेल्या आस्थापनांवर त्यांनी सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. नजीकच्याच काळात त्यांच्या मोठमोठ्या प्रस्थापित फूड कंपन्यांवर आणि प्रस्थापित हॉटेल्सवर झालेल्या धडक कारवाया आपल्याला माहीतच असतील.

अन्न व औषध प्रशासन म्हणजेच Food & Drug Administration (FDA) अंतर्गत नेमके कोणते विभाग येतात आणि आयुक्त म्हणून त्यांची प्रमुख कार्ये आणि जबाबदाऱ्या काय आहेत, हे आज इथे पाहूयात,

१. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) मुख्य विभाग

FDA, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या शाखा किंवा विभागांमध्ये कार्य करते,

अन्न सुरक्षा विभाग

हा विभाग राज्यातील नागरिकांना मिळणाऱ्या अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काम करतो. यामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, अन्न उत्पादक कंपन्या, दुकाने, मॉल तसेच क्विक-कॉमर्स कंपन्यांची (उदा. ब्लिंकिट, झेप्टो, इ.) तपासणी केली जाते.

औषध नियंत्रण विभाग

राज्यात विकली जाणारी औषधे, सौंदर्य प्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणे यांची गुणवत्ता तपासणे, बनावट औषधांची विक्री रोखणे, औषध दुकानांचे लायसेन्स व नियमांचे पालन, आणि रक्तपेढ्यांची तपासणी या विभागाद्वारे केली जाते.

Nagpur FDA Actoin: तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद

२. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अंतर्गत येणारी प्रमुख कार्ये आणि जबाबदाऱ्या

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीए प्रशासनाने सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडित खालील या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे:

अन्नातील भेसळ रोखणे आणि अचानक तपासणी

दूध, पनीर, खवा यांसारख्या रोजच्या वापरातील पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राज्यभरात अचानक धाड मारणे आणि मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवणे हे या विभागाचे मुख्य काम आहे.

स्वच्छता आणि सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी

हॉटेल्स, कॅन्टीन आणि फूड आउटलेट्समध्ये अस्वच्छता आढळल्यास किंवा अन्न साठवणुकीचे नियम पाळले जात नसल्यास त्यांचे परवाने तत्काळ निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई या विभागामार्फत केली जाते.

FDA Action On Hotels: तुकाराम मुंढे जोमात हॉटेल मालक कोमात! FDAच्या कारवाईत मुंबईसह राज्यातील मोठ्या रेस्टॉरंट्सचे परवाने रद्द

सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी आणि त्यानिगडीत नियमन

तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, उघड्यावर किंवा सुट्या स्वरूपात खाद्यतेल विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे आणि दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या विभागाकडे आहेत.

बनावट आणि निकृष्ट औषधांवर नियंत्रण

राज्यात कुठल्याही भागात बनावट किंवा एक्सपायरी डेटची औषधे विकली जाऊ नयेत, यासाठी रिटेल व किरकोळ औषध विक्रेत्यांवर सतत नजर ठेवणे आणि लायसेन्स तपासणे हे औषध विभागाचे कार्य आहे.

पारदर्शक आणि डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा सुरळीत राबवणे

सामान्यांना एफडीएशी थेट जोडण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी complaints.mahafda.in हे ऑनलाइन पोर्टल अधिक प्रभावी केले आहे. याद्वारे नागरिक घरबसल्या भेसळयुक्त अन्न, निकृष्ट औषध किंवा अस्वच्छतेबद्दल थेट तक्रार नोंदवू शकतात.

थोडक्यात निष्कर्ष काय तर..

तुकाराम मुंढे यांनी FDA मध्ये हाती वज्र घेतल्यापासून प्रशासकीय यंत्रणेला चांगलीच शिस्त लागली आहे. “प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे” या मुद्यावर भर देत, नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे हेच या विभागाचे मुख्य धोरण बनले आहे.

 

Web Title: Tukaram mundhe fda crackdown maharashtra food safety auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • FDA
  • maharashtra
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

जिल्हा परिषदेच्या २८३ शाळा क्रीडांगणाविना! क्रीडा विकासाला ब्रेक; अंजनगाव सुर्जीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रलंबित
1

जिल्हा परिषदेच्या २८३ शाळा क्रीडांगणाविना! क्रीडा विकासाला ब्रेक; अंजनगाव सुर्जीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रलंबित

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा
2

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा

धाराशिवच्या जलसाठ्याची चिंताजनक स्थिती; २२५ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा अवघा ६.३६ टक्के
3

धाराशिवच्या जलसाठ्याची चिंताजनक स्थिती; २२५ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा अवघा ६.३६ टक्के

राज्यातील सर्व शाळात आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; मुलांसोबत दररोज 20 मिनिटे ‘हा’ उपक्रम राबविण्याचेही आवाहन
4

राज्यातील सर्व शाळात आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; मुलांसोबत दररोज 20 मिनिटे ‘हा’ उपक्रम राबविण्याचेही आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.