Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांच्या ताटात आता फक्त पौष्टिक आहार! राज्यातील सर्व शाळांसाठी तुकाराम मुंढे यांची नवी नियमावली, विनापरवाना खाद्यविक्रीवर थेट…

Tukaram Mundhe News: एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि कँटीनसाठी एफएसएसएआयचे कडक नियम लागू केले आहेत. ५० मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी आणली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 29, 2026 | 06:18 PM
राज्यातील सर्व शाळांसाठी तुकाराम मुंढे यांची नवी नियमावली (Photo Credit- Ai)

राज्यातील सर्व शाळांसाठी तुकाराम मुंढे यांची नवी नियमावली (Photo Credit- Ai)

Follow Us
Follow Us:
  • मुलांच्या ताटात आता फक्त पौष्टिक आहार!
  • राज्यातील सर्व शाळांसाठी तुकाराम मुंढे यांची नवी नियमावली
  • विनापरवाना खाद्यविक्रीवर थेट…
Tukaram Mundhe: अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी आता राज्यातील शाळा, वसतिगृहे आणि तेथील कँटीनमधील अन्नाच्या गुणवत्तेवर आपला मोर्चा वळवला आहे. राज्यात २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकस आणि न्यूट्रिशनयुक्त आहार मिळावा यासाठी ‘सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम लागू करण्याचे कडक आदेश त्यांनी दिले आहेत. पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्यातील १ लाखांहून अधिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे.

शाळेच्या ५० मीटर परिसरात नियम कडक; विनापरवाना विक्रीस बंदी!

तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, २२ महिन्यांच्या बालकांपासून ते १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा आणि वसतिगृहांना २०२० च्या नियमावलीनुसार एफएसएसएआयचे नियम लागू राहतील. शाळेत अन्न पुरवणाऱ्या कंत्राटदाराकडे एफएसएसएआयचा (FSSAI) परवाना असणे बंधनकारक आहे. विनापरवाना खाद्यपदार्थ विक्री होत नसल्याची खात्री करण्याची थेट जबाबदारी शाळा प्रमुखांची असेल. शाळेच्या ५० मीटर परिसरातील सर्व दुकाने आणि खाद्यपदार्थ पुरवठादारांवर एफडीएची करडी नजर असेल.

‘ईट राईट स्कूल’ संकल्पना अन् दरमहा आढावा!

शाळांना आहाराची आदर्श केंद्रे बनवण्यासाठी ‘ईट राईट स्कूल’ ही संकल्पना राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वयंपाकगृहात उच्च दर्जाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. या मोहिमेत शिक्षण विभाग आणि समाजकल्याण विभागाची मदत घेतली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेचा दरमहा आढावा घेतला जाणार असल्याचेही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

मोठी बातमी ! तुकाराम मुंढे यांना हायकोर्टाचा दणका; ‘त्या’ कारवाईला स्थगिती

तुकाराम मुंढे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख ठळक मुद्दे

  • महाराष्ट्रातील सर्व शासकीय, अनुदानित, खासगी, निवासी तसेच राज्य मंडळ, CBSE, ICSE व इतर मंडळांशी संलग्न शाळांना आदेश लागू.
  • शाळांमधील कॅन्टीन, टक शॉप, मध्यान्ह भोजन केंद्रे, वसतिगृह स्वयंपाकगृहे आणि सर्व अन्नपुरवठादारांना वैध FSSAI परवाना किंवा नोंदणी अनिवार्य.
  • शाळेच्या आवारात तसेच शाळेच्या प्रवेशद्वारापासून सर्व दिशांना ५० मीटर परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्री, जाहिरात, विपणन व मोफत वितरणास प्रतिबंध.
  • जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी व ट्रान्स फॅट असलेल्या अन्नपदार्थांना शालेय परिसरात मज्जाव.
  • विद्यार्थ्यांना फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, दूध व स्थानिक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्यावर भर.
  • प्रत्येक शाळेत सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता, अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, कीड नियंत्रण आणि कचरा व्यवस्थापनाची काटेकोर अंमलबजावणी.
  • प्रत्येक शाळेत Food Safety Display Board, Food Safety Supervisor आणि Health and Wellness Ambassador किंवा नोडल अधिकारी नियुक्त करणे आवश्यक.
  • प्रत्येक शाळेची वर्षातून किमान दोन वेळा अन्न सुरक्षा तपासणी आणि किमान एकदा अन्न नमुना संकलन.
  • नियमभंग करणाऱ्या शाळा, कॅन्टीन, पुरवठादार व विक्रेत्यांविरुद्ध सुधारणा सूचना, परवाना कारवाई, जप्ती, अभियोजन आणि आवश्यकतेनुसार कठोर दंडात्मक कारवाई.
  • शालेय शिक्षण विभाग, शिक्षण मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न सुरक्षा अधिकारी, शाळा व्यवस्थापन, पालक आणि विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित,
  • प्रत्येक शाळेला – Eat Right School आणि शालेय कॅन्टीनला आरोग्यदायी आहाराचे आदर्श केंद्र म्हणून विकसित करण्याचा उद्देश.
  • “सुरक्षित अन्न – निरोगी बालपण सक्षम महाराष्ट्र” हा राज्यव्यापी उपक्रमाचा मूलमंत्र.
 FDA Big Action: ‘उत्तम उपहारगृहा’वर एफडीएचा मोठा हातोडा! अस्वच्छता अन्…; परवाना निलंबित करून हॉटेल केले सील

Web Title: Tukaram mundhe fda strict rules eat right school campaign maharashtra marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • FDA
  • Maharashtra Schools
  • School Students
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

प्रतिष्ठित क्रिकेट क्लबांच्या किचनमधील धक्कादायक वास्तव; झुरळे, बुरशी अन् एफडीएने केले ५ परवाने निलंबित
1

प्रतिष्ठित क्रिकेट क्लबांच्या किचनमधील धक्कादायक वास्तव; झुरळे, बुरशी अन् एफडीएने केले ५ परवाने निलंबित

Nagpur मध्ये सुटकेचा थरार! ८०० विद्यार्थी तीन-चार फूट पाण्यात अडकले; मानवी साखळी करत…, पहा Video
2

Nagpur मध्ये सुटकेचा थरार! ८०० विद्यार्थी तीन-चार फूट पाण्यात अडकले; मानवी साखळी करत…, पहा Video

मोठी बातमी ! तुकाराम मुंढे यांना हायकोर्टाचा दणका; ‘त्या’ कारवाईला स्थगिती
3

मोठी बातमी ! तुकाराम मुंढे यांना हायकोर्टाचा दणका; ‘त्या’ कारवाईला स्थगिती

वाई तालुक्यात FDAच्या कारवायांचा दिखावा की खरोखरची धडक मोहीम? जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह!
4

वाई तालुक्यात FDAच्या कारवायांचा दिखावा की खरोखरची धडक मोहीम? जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.