'उत्तम उपहारगृहा'वर एफडीएचा मोठा हातोडा! अस्वच्छता अन्...;
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत २२ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. तपासणीत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत अनेक गंभीर उल्लंघने समोर आली. विशेष म्हणजे शहरातील नावाजलेल्या उपहारगृहात ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांच्या निर्मितीतच आरोग्याच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
तपासणीदरम्यान समोसे, भजी आदी पदार्थांसाठी वारंवार वापरलेले सरकीचे तेल वापरले जात असल्याचे आढळले. अन्न पदार्थांसाठी वापरल्या जाणारे टेलाचे बीआर रिडिंग २५ पर्यंत नार्मल असते. माञ उत्तम मधील तेलाची टीपीसी मीटरद्वारे तपासणी केली असता तेलाचे बीआर रिडिंग ५८ इतके नोंदले गेले. तसेच इमरती जिलेबी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती तुपाचे (डालडा) रिडिंग ३६ इतकी होती. जी की, आरोग्यास अपायकारक असल्याचे स्पष्ट झाले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी कि.ल. झाडे, सहायक आयुक्त द.वि. पाटील आदींनी केली.
अन्न तयार करण्याच्या ठिकाणी झुरळांचा मुक्त वावर, भिंतींवर जळमटे व तेलाचा थर, उघड्या कचरापेट्या, खिडक्यांना जाळी नसणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या. इडलीसाठी तयार केलेले आंबवलेले पीठ सांडपाण्याच्या नाल्यालगत उघड्यावर ठेवण्यात आले होते. याशिवाय उत्पादन विभागात तंबाखूची पाकिटे आणि भिंतींवर थुंकल्याच्या खुणाही आढळल्या.
मिठाई उत्पादन सुरू असतानाही आस्थापनेने उत्पादक ऐवजी रेस्टॉरंट या प्रकारचा परवाना घेतल्याचे निदर्शनास आले, इमरती-जिलेबीमध्ये वापरल्या जाणाऱ्या टार्द्राझीन या कृत्रिम रंगाचा वापर किती प्रमाणात करायचा, याची माहिती कामगारांना नव्हती. शिवाय सुमारे २५ ते ३० कामगारांचे वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम-२००६ अंतर्गत आढळलेल्या गंभीर उल्लंघनांमुळे उत्तम उपहार गृहाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. आस्थापना बंद करण्यात आली आहे. वारंवार वापरलेल्या खाद्यतेल व वनस्पती तुपाचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवालानंतर कारवाई केली जाणार आहे.
मलम कागदावर, औषध रिकाम्या बाटल्यांमध्ये; FDA च्या तापासातून दवाखान्यांतील धक्कादायक प्रकार उघड






