
Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ
अहिल्यानगरमध्ये उमेदवारांचे अपहरण
उमेदवार अचानक गायब झाल्याने वाढला संशय
निवडणुकीआधी अहिल्यानगरमध्ये खळबळ
अहिल्यानगर: राज्यात महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. सर्वत्र प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान निवडणुकीचहया प्रचारात अहिल्यानगरमध्ये मोठी घडामोड घडली आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र त्यातच मनसेचे दोन उमेदवार गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचे अपहरण केले गेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसेचे दोन उमेदवार गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मनसेचे दोन उमेदवारांचा एक दिवसापासून कुटुंबाशी संपर्क झाला नसल्याचे समोर आले आहे. उमेदवार ज्या भागातून निवडणूक लढवत आहेत. ती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का
महाराष्ट्राच्या राजकारणात आज नव्या युतीचा जन्म झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज्यात नवीन समीकरणे दिसून येत आहेत. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे बंधु यांनी युती केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. दरम्यान ठाकरे बंधु एकत्र येताच मनसेला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे.
Maharashtra Politics: ‘युती झाली पण गळती…’; ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला आणि मनसेला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात आज नव्या युतीची सुरुवात झाली आहे. मात्र युतीची घोषणा होताच छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला धक्का बसला आहे. मनसेचे जिल्हाप्रमुख यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे निवडणूक होण्याआधीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे युती झाली असली तरी पक्षात सुरू असलेली गळती कशी थांबवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.