Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! विजेच्या धक्क्याने सख्ख्या भावांचा मृत्यू; कोल्हापूरच्या शाहूवाडीतील घटना

भात पिकाची रोप लावण केलेल्या शेतात तणनाशक व खत घालण्यास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा वीजेच्या तारेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 05, 2024 | 11:27 AM
धक्कादायक! विजेच्या धक्क्याने सख्ख्या भावांचा मृत्यू; कोल्हापूरच्या शाहूवाडीतील घटना
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : भात पिकाची रोप लावण केलेल्या शेतात तणनाशक व खत घालण्यास गेलेल्या सुहास कृष्णा पाटील (वय ३६) व त्याचा सख्खा लहान भाऊ स्वप्नील (३१, दोघे रा. कोपार्डे, ता. शाहूवाडी) यांचा वीजेच्या तारेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. बुधवारी (दि, ३) दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली. सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुहास व स्वप्नील दोघेही विवाहित आहेत.

सुहास व स्वप्नील शेतीत काम करत होते. शेतीला जोडधंदा म्हणून दोघे गावाशेजारील येळाणे हद्दीतील चनवाड फाटा येथे गाड्या धुण्यासाठीचे सर्व्हिंसिंग सेंटरही चालवत होते. दोघेही बुधवारी (दि, ३) दुपारी दोनच्या सुमारास जेवण झाल्यानंतर भात लावण केलेल्या शेतात तणनाशक व खत घालण्यासाठी वडिलांबरोबर गेले. दोघे तणनाशक व खत घालत होते. त्यावेळी वडिलांनी जनावरांना वैरण काढली. त्यानंतर ते भारा घेऊन घरी आले.

पाठीमागे दोघे भाऊ भात शेतात काम करत होते. त्यावेळी नदीकडील बाजूस शेतपंपासाठी असणाऱ्या वीज खांबाच्या आधारासाठी लावलेल्या तारेमधून वाहत असलेल्या वीज प्रवाहाचा धक्का मोठा भाऊ सुहास याला बसला. या धक्‍क्याने सुहास धडपडत खाली कोसळला. भाऊ कोसळल्याचे पाहून स्वप्नीलने त्याला पकडले. त्यामुळे त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यात दोघांचाही जागीच होरपळून मृत्यू झाला.

बराच वेळ झाला तरी दोन्ही मुले घरी का आली नाहीत, म्हणून त्यांना बोलावण्यासाठी वडील कृष्णा पुन्हा शेतात गेले. त्यावेळी वीज खांबाशेजारी दोन्ही मुलगे निपचित पडल्याचे दिसले. वीज तारेच्‍या धक्‍क्‍याने दोघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधून ते माघारी फिरले. आरडाओरडा करतच ते गावात आले आणि गावकऱ्यांना झालेला प्रकार सांगितला.

महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट

ग्रामस्थांनी घटनेची माहिती महावितरणला देत घटनास्थळाकडे धाव घेतली. सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुहास व स्वप्नील दोघेही विवाहित आहेत. सुहास याला एक मुलगी आहे. घटनास्थळी महावितरणचे अधिकारी व पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Two died due to electric shock incident in kolhapurs shahuwadi nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 11:23 AM

Topics:  

  • Brothers
  • kolhapur
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.