Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tasgaon Politics : तासगावमध्ये राजकीय भूकंप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेत्यांची बंडखोरी

तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये एबी फॉर्म वाटपावरून उसळलेल्या नाराजीने मोठा राजकीय भूकंप घडवला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 18, 2025 | 05:53 PM
तासगावमध्ये राजकीय भूकंप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेत्यांची बंडखोरी

तासगावमध्ये राजकीय भूकंप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेत्यांची बंडखोरी

Follow Us
Close
Follow Us:
  • राजकीय घडामोडींना वेग
  • तासगावमध्ये राजकीय भूकंप
  • दोन माजी नगराध्यक्षांची बंडखोरी
तासगाव/ मिलिंद पोळ : तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये एबी फॉर्म वाटपावरून उसळलेल्या नाराजीने मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. आर. आर. पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते व माजी नगराध्यक्ष अजय पाटील आणि माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे या दोघांच्या एकाच दिवशी झालेल्या बंडखोरीमुळे आमदार रोहित पाटील गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

अजय पाटील यांनी पत्नीची उमेदवारी शेवटच्या क्षणी नाकारल्यानंतर संतप्त होत शरद पवार गटाला रामराम ठोकला. “गेली ३० वर्षे निष्ठेने सोबत राहिलो, तरी पैसा खर्च करणाऱ्यालाच प्राधान्य,” असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. भावनिक स्वरात बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्यांनी तत्काळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटात) प्रवेश करून पत्नी ज्योती पाटील यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केल्याची घोषणा केली.

याच दरम्यान, अमोल शिंदे यांच्या पत्नीच्या उमेदवारीलाही नकार मिळाल्याने त्यांनी स्वतंत्र मार्ग पत्करला. गटाच्या निर्णयाविरोधात शिंदे यांनी पत्नीचा अर्ज अपक्ष म्हणून सादर केला. या दोन माजी नगराध्यक्षांच्या बंडामुळे रोहित पाटील गटातील अंतर्गत असंतोष उघड झाला आहे.

तासगावमध्ये आता राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप व माजी खासदार संजय पाटील यांची विकास आघाडी असा चौरंगी मुकाबला निर्माण झाला असून, निवडणूक तापली आहे. एबी फॉर्मवरील निर्णयामुळे निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घडामोडींमुळे तासगावच्या निवडणुकीचे समीकरण बदलणार का याकडे तासगावकरांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Two members of sharad pawars party have rebelled in tasgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • Rohit Patil
  • Sharad Pawar
  • Tasgaon News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारण फिरले! ‘या’ बड्या नेत्याने सोडली शरद पवारांची साथ, निवडणुकीआधी खळबळ
1

Maharashtra Politics: राजकारण फिरले! ‘या’ बड्या नेत्याने सोडली शरद पवारांची साथ, निवडणुकीआधी खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.