Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामागे भाजपचा ‘हा’ आहे मोठा उद्देश? खासदारांची जुळवाजुळव झाली सुरु

आगामी काळात राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला किती वेग येतो, याकडे लक्ष लागले आहे. भाजपला संसदीय संख्याबळाची गरज आणि राष्ट्रवादीसमोर अस्तित्वाचा प्रश्न, या दोन वेगळ्या राजकीय गरजांचा संगम विलीनीकरणाच्या चर्चेला नवी दिशा देऊ शकतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 17, 2026 | 09:10 AM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामागे भाजपचा 'हा' आहे मोठा उद्देश? खासदारांची जुळवाजुळव झाली सुरु

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामागे भाजपचा 'हा' आहे मोठा उद्देश? खासदारांची जुळवाजुळव झाली सुरु

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा सुरू
  • या विलीनीकरणाचा संबंध दिल्लीतील संसदीय राजकारणाशी जोडला जात आहे.
  • आगामी काळात महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी भाजपला आवश्यक संख्याबळ उभे करण्याचे आव्हान असल्याची चर्चा.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच या घडामोडींचा संबंध थेट दिल्लीतील सत्ताकारणाशी जोडला जात आहे. आगामी काळात संसदेत मांडल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या विधेयकांसाठी आवश्यक संख्याबळ उभे करण्याचे आव्हान भाजपसमोर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचे महत्त्व वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विलीनीकरण हा केवळ दोन पक्षांच्या एकत्र येण्याचा विषय नसून त्यामागे भाजपचे संसदीय गणितही असू शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे.

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयके पुन्हा संसदेत आणण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याचे सांगितले जाते. हिवाळी अधिवेशनात अथवा त्यापूर्वी विशेष अधिवेशन घेऊन या विधेयकांना मंजुरी मिळवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. मात्र, या विधेयकांच्या मंजुरीसाठी भाजपला आणखी ४४ खासदारांचा पाठिंबा आवश्यक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला मित्रपक्षांसह अन्य पक्षांच्या खासदारांचीही साथ मिळवावी लागणार आहे. याच ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदेतील अस्तित्व महत्त्वाचे ठरते.

खासदारांची भूमिका निर्णायक?

या पक्षाचे लोकसभेत आठ आणि राज्यसभेत एक खासदार आहे. संख्येने मर्यादित असले तरी महत्त्वाच्या संसदीय निर्णयांच्या वेळी या खासदारांची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यामुळे शरद पवार यांच्याशी राजकीय संवाद आणि दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र आणण्याच्या शक्यतांकडे भाजपकडून गांभीर्याने पाहिले जात असल्याचे मानले जात आहे.

दोन्ही बाजूंकडून एकमत होणे हे आव्हान

मात्र, विलीनीकरणाच्या चर्चेत केवळ भाजपची गरज महत्त्वाची नाही. दोन्ही गटांतील नेतृत्व, पक्षावरील नियंत्रण, संघटनात्मक रचना आणि भविष्यातील राजकीय दिशा हेही कळीचे मुद्दे आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भूमिका, तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची राजकीय वाटचाल यामुळे या प्रक्रियेला अनेक पदर आहेत. विलीनीकरणाबाबत दोन्ही बाजूंकडून एकमत होणे हे मोठे आव्हान असेल.

नवी राजकीय समीकरणे जुळणार?

आगामी काळात राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला किती वेग येतो, याकडे लक्ष लागले आहे. भाजपला संसदीय संख्याबळाची गरज आणि राष्ट्रवादीसमोर अस्तित्वाचा प्रश्न, या दोन वेगळ्या राजकीय गरजांचा संगम विलीनीकरणाच्या चर्चेला नवी दिशा देऊ शकतो. अखेर राष्ट्रवादी एकत्र येणार की संसदेतील विधेयकांच्या निमित्ताने राजकीय समीकरणे जुळवली जाणार, हे आगामी घडामोडींवर अवलंबून असेल.

FAQ

1. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती चर्चा सुरू आहे?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे.

2. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा संबंध कशाशी जोडला जात आहे?

या विलीनीकरणाचा संबंध दिल्लीतील संसदीय राजकारणाशी जोडला जात आहे.

3. भाजपसमोर कोणते आव्हान असल्याची चर्चा आहे?

संसदेत महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी आवश्यक खासदारांचे संख्याबळ उभे करण्याचे आव्हान असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Bjp parliamentary arithmetic behind merger of ncp nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

BJP Politics राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामागे काय आहे भाजपचे संसदीय गणित !
1

BJP Politics राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामागे काय आहे भाजपचे संसदीय गणित !

Maharashtra Politics : राज्यात लवकरच ‘ऑपरेशन टायगर-3’ होणार? महायुतीतील मंत्र्याने केले सूचक विधान
2

Maharashtra Politics : राज्यात लवकरच ‘ऑपरेशन टायगर-3’ होणार? महायुतीतील मंत्र्याने केले सूचक विधान

Amit Shah : ‘अजितदादांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी विद्यापीठ’; अमित शाह यांच्याकडून कार्याचा गौरव
3

Amit Shah : ‘अजितदादांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी विद्यापीठ’; अमित शाह यांच्याकडून कार्याचा गौरव

Supriya Sule : अजित पवार यांचा पुतळा पाहून सुप्रिया सुळे भावूक; भावाला अभिवादन करत व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “आठवणी दाटून…
4

Supriya Sule : अजित पवार यांचा पुतळा पाहून सुप्रिया सुळे भावूक; भावाला अभिवादन करत व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “आठवणी दाटून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.