Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prasad Lad on Rohit Pawar : रोहित पवारांचे आरोप पक्षाला मान्य आहेत का? प्रसाद लाडांचा शरद पवारांना थेट सवाल!

Prasad Lad on Rohit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर उपस्थित केलेल्या संशयावरून भाजप आमदार प्रसाद लाड आक्रमक झाले आहेत.

  • By विवेक
Updated On: Nov 17, 2026 | 03:54 PM
Prasad lad

Prasad lad

Follow Us
Follow Us:
  • रोहित पवारांच्या आरोपांवर प्रसाद लाड संतापले
  • प्रसाद लाड यांचं शरद पवारांना पत्र
  • फडणवीसांची बदनामी सहन करणार नाहीमी – लाड
 

Prasad Lad on Rohit Pawar : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचं प्रकरण आता चांगलंच तापताना दिसत आहे. या अपघाताच्या चौकशीवरून आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत बहुचर्चित ‘मफलरमॅन’ कोण? याचा खुलासा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले. यामुळे मोठी खळबळ उडाली असून मोठा वाद निर्माण झाला आहे. पवारांच्या आरोपांवर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून भाजप नेत्यांनी रोहित पवारांवर टीकेचा भडीमार केला आहे.

त्यातच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनीदेखील आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. प्रसाद लाड यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. रोहित पवारांनी केलेले आरोप ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रसाद लाड यांचं शरद पवारांना पत्र, नेमकी काय मागणी?

रोहित पवार यांनी 16 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी त्यांनी दाखवलेल्या छायाचित्राच्या आधारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही संशय व्यक्त केला होता.

चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर संताप; मुख्यमंत्री फडणवीसांवरील आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर

यावर प्रसाद लाड यांनी आक्षेप घेतला आहे. रोहित पवारांचे आरोप वैयक्तिक आहेत की त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे, हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट करावं, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.

प्रति
ज्येष्ठ नेते मा. शरदचंद्र पवार साहेब,
आपण आणि खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकार परिषद, अधिकृत निवेदन, पत्र किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहित पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेबाबत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याबाबत रोहित पवारांनी केलेले आरोप आपल्या पक्षाला मान्य नसतील, तर त्याचे स्पष्ट खंडन करावे. अन्यथा रोहित पवार यांनी मांडलेल्या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा असल्याचे स्पष्टपणे सांगावे.
@PawarSpeaks @supriya_sule
#Mumbai #Maharashtra #PrasadLad
— Prasad Lad (@PrasadLadInd) November 17, 2026

रोहित पवारांवर प्रसाद लाड संतापले

प्रसाद लाड यांनी माध्यमांशी बोलताना रोहित पवारांवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशा प्रकारे आरोप करणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले. फडणवीस यांनी अजित पवारांना नेहमीच मोठ्या भावाप्रमाणे साथ दिली. रोहित पवारांनी आपले आरोप सिद्ध करावेत किंवा जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत लाड यांनी कायदेशीर नोटीस देण्याचाही इशारा दिला.

यावेळी प्रसाद लाड यांनी आक्रमक भूमिका घेत ‘प्रसिद्धीच्या हव्यासापोटी रोहित पवार जे करतायेत ते त्यांनी बंद करावं नाहीतर रस्त्यावर जिथे दिसतील तिथे त्यांचा कार्यक्रम करण्याचं काम आम्ही करू,’ असा इशारा त्यांनी दिला.

आता शरद पवार काय भूमिका घेणार?

प्रसाद लाड यांनी पत्रातून शरद पवारांसमोर काही थेट प्रश्न ठेवले आहेत. रोहित पवारांची भूमिका पक्षाला मान्य नसेल तर तिचं स्पष्ट खंडन करावं आणि समर्थन असेल तर तेही जाहीर करावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे आता शरद पवार या पत्राला काय उत्तर देतात आणि पक्षाकडून अधिकृत भूमिका कधी मांडली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचं सत्य समोर येण्याची मागणी एका बाजूला सुरू असतानाच, दुसरीकडे या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचाही जोर वाढताना दिसत आहे.

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Conspiracy: ‘तो’ मफलरवाला कोण? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रसाद लाड यांनी शरद पवारांना पत्र का लिहिलं?

    Ans: रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट व्हावी, यासाठी प्रसाद लाड यांनी पत्र लिहिलं आहे.

  • Que: प्रसाद लाड यांनी रोहित पवारांकडे कोणती मागणी केली आहे?

    Ans: रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या आरोपांचं समर्थन करण्याऐवजी ते सिद्ध करावेत किंवा जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. कायदेशीर नोटीस देण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.

  • Que: रोहित पवारांनी सांगितलेला मफलरमॅन कोण?

    Ans: रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मफलरमॅन म्हणत त्यांचे VSR कंपनीच्या मालकांसोबतचे छायाचित्र दाखवले.

Web Title: Prasad lad on rohit pawar over ajit pawar plane crash vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • CM Devendra Fadnavis
  • NCP Sharad Pawar
  • Prasad Lad
  • rohit pawar
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

‘मफलर मॅन’वरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…
1

‘मफलर मॅन’वरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…

चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर संताप; मुख्यमंत्री फडणवीसांवरील आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर
2

चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर संताप; मुख्यमंत्री फडणवीसांवरील आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Conspiracy: ‘तो’ मफलरवाला कोण? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा
3

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Conspiracy: ‘तो’ मफलरवाला कोण? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा

अजितदादांची जागा घेऊ पाहताहेत रोहित पवार, सोलापुरातील टीकेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
4

अजितदादांची जागा घेऊ पाहताहेत रोहित पवार, सोलापुरातील टीकेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.