Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केडीएमसी नगररचना विभागातील दोन जणांना अटक, बनावट कागद पत्रांच्या जाळ्यात अडकले

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम मंजुरीसाठी काही कागदपत्र सादर करण्यात आली होते. या कागदपत्रात फेरफार करण्यात आल्याची तक्रार केडीएमसीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 23, 2024 | 10:52 AM
केडीएमसी नगररचना विभागातील दोन जणांना अटक, बनावट कागद पत्रांच्या जाळ्यात अडकले
Follow Us
Follow Us:

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात काम करणाऱ्या दोन जणांना बाजारपेठ पोलिसांनी काल सायंकाळी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बाळू बहिराम आणि राजेश बागुल अशी आहेत. या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचा नगररचना विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम मंजुरीसाठी काही कागदपत्र सादर करण्यात आली होते. या कागदपत्रात फेरफार करण्यात आल्याची तक्रार केडीएमसीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी शहानिशा करत, दोन महिने तपास करत बाजारपेठ पोलिसांनी याप्रकरणी केडीएमसीच्या नगररचना विभागातील दोघा सर्वेयरला अटक केली आहे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. राजेश बागुल नगररचना विभागात ड्राफ्ट्समन आहे. तर बाळू बहिराम हा सर्वे करणारा आहे.

दोघे केडीएमसीच्या सर्वेयर विभागात कार्यरत आहेत. दरम्यान या घटनेमुळे केडीएमसीचा नगररचना विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केडीएमसी नगररचना विभागात अनेक अधिकारी, कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यांची अन्य विभागात बदली करण्याची तसदी आजतागायत कोणत्याही महापालिका अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याचे दिसून येतं आहे. जरी बदली झाली असली तरी संबंधित अधिकारी तीन ते चार महिन्यात पुन्हा नगररचना विभागात कार्यरत होत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. आज नगररचना विभागातील दोन सर्वेयरना कागदपत्रांमध्ये खाडाखोड करत बनावट कागद पत्रांच्या आधारे केडीएमसीची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर नगररचना विभागातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा उजेडात आला आहे. या प्रकरणात मोठे अधिकारी देखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Two persons from kdmc town planning department arrested caught in the web of fake documents kalyan dombivli municipal corporation thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2024 | 10:52 AM

Topics:  

  • kalyan
  • kalyan crime case
  • Kalyan Dombivli Municipal Corporation
  • thane

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?
2

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
3

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप
4

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.