ललित पाटील प्रकरणी दोन महिलांना केली अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होणार?
ललितची कसून चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे त्याच्या दोन महिला साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींनाही नाशिक पोलिसांनी अटक करून भल्या पहाटेच पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणी धक्कादायक खुलासे होणार असून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील याला काल पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. त्याचा ताबा सध्या मुंबई पोलिसांकडे आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहितीसमोर येत आहे. एकीकडे ललितची कसून चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे त्याच्या दोन महिला साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींनाही नाशिक पोलिसांनी अटक करून भल्या पहाटेच पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणी धक्कादायक खुलासे होणार असून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दोन महिला ललित पाटीलच्या मैत्रिणी असल्याची माहिती आहे. ललित पाटील ससून रूग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी त्यांच्या संपर्कात होत्या. या दोन्ही महिलांनी त्याला पळून जाण्यासाठी मदत केल्याची माहिती आहे.
ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी काल अटक केल्यानंतर पुणे पोलिस देखील कसून तपास करत आहेत. त्यांनी काल नाशिकमधून दोन्ही महिलांना अटक केली आहे. ललित पाटील पळून गेल्यानंतर तो नाशिकला गेला होता. तो नाशिकला गेला तेव्हा त्याला या महिलांनी पैसै दिले सोबतच त्याची राहण्याची आणि पळून जाण्यासाठी देखील त्यांनी मदत केल्याची माहिती समोर आली आहे.
जमा झालेले पैसे, सोनं हे या दोन महिलांकडे होते अशी माहिती पोलिसांकडे आहे. आज या महिलांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. फरार असल्याच्या काळात तो सातत्याने या दोघींच्या संपर्कात होता. ड्रग्सच्या काळया कमाईतून मिळवलेला पैसा ललित पाटीलने या दोघींकडे ठेवल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी नाशिक शहरातून दोघींना अटक केली.
Web Title: Two women arrested in lalit patil case will a big racket be exposed nrdm