Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यवतमाळमधील भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू, घटनास्थळावरून कार चालक फरार

दिवसभराचे काम आटपून घरी परत जात असताना दोन तरुणांचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 06, 2024 | 12:14 PM
यवतमाळमधील भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू, घटनास्थळावरून कार चालक फरार
Follow Us
Close
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे रस्ते अपघातांमध्ये वाढ झाली आहे. सतत होत असलेल्या अपघातांमध्ये अनेक आपला जीव देखील गमवावा लागला आहे. यवतमाळच्या (Yavatmal) दारव्हा तालुक्यामध्ये घडलेल्या भीषण अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दिवसभराचे काम आटपून घरी परत जात असताना दोन तरुणांचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ज्या कारने दुचाकीला धडक दिली ती कार तहसीलदारांची असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर वाहनचालक घटना स्थळावरून पळून गेल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

यवतमाळमधील बोरी अरब येथून काम पूर्ण करून दोन तरुण घराकडे जाण्यासाठी निघाले होते. तेव्हा रस्त्यात कार आणि दुचाकीचा अपघात झाला. शहराजवळ असणाऱ्या एका मंदिराच्या परिसरात मागून येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये एका युवकाचा मृत्यू घटनास्थळावर झाला तर एका युवकाचा मृत्यू रुग्णालयात उपचारदरम्यान झाला. अपघातस्थळी धडक दिलेली कार ही तहसीलदारांची असल्याचे समोर आले आहे. अंकुश देवराव भोजने आणि श्रीकांत प्रमोद ठाकरे असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी लगेच दाखल झाले. मात्र अपघात केलेली कार घटनास्थळावरून फरार झाली आहे. ही कार तहसीलदार परसराम भोसले यांच्या मालकीचे असल्याने पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. कार कोण चालवत होत? याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करत आहेत. सतत होत असलेले रस्ते अपघात थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र अपघातांची मालिका सुरु असल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे रस्ते महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

Web Title: Two youths died in a horrific accident in yavatmal car driver absconded from the scene accident crime death nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2024 | 12:12 PM

Topics:  

  • maharashtra
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Maharashtra Elections: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या अर्ध्या जागांवर महिलांचे वर्चस्व, ३४ जागांचे आरक्षण जाहीर
1

Maharashtra Elections: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या अर्ध्या जागांवर महिलांचे वर्चस्व, ३४ जागांचे आरक्षण जाहीर

Devendra Fadnavis : आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल, देवेंद्र फडणवीसा यांचा विश्वास
2

Devendra Fadnavis : आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल, देवेंद्र फडणवीसा यांचा विश्वास

“समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहोचविण्याचा भाजपाचा प्रामाणिक संकल्प”,नरेंद्र पवारांचे आवाहन
3

“समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहोचविण्याचा भाजपाचा प्रामाणिक संकल्प”,नरेंद्र पवारांचे आवाहन

Aditi Tatkare : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा, आदिती तटकरे यांचे निर्देश
4

Aditi Tatkare : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा, आदिती तटकरे यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.