Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बंगाडीवासींना लाकडी पुलाचाच आधार! प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष; दरवर्षी श्रमदानातून उभारतात पूल

नक्षलग्रस्त लाहेरीजवळील चंगाडी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदान करीत गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर 'लाकडी पूल' उभारला. दरवर्षी ग्रामवासी श्रमदानातून आवश्यक गरज लक्षात घेत लाकडी पूल उभारत आले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 04, 2025 | 07:18 PM
बंगाडीवासींना लाकडी पुलाचाच आधार! प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष; दरवर्षी श्रमदानातून उभारतात पूल

बंगाडीवासींना लाकडी पुलाचाच आधार! प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष; दरवर्षी श्रमदानातून उभारतात पूल

Follow Us
Close
Follow Us:
  • भामरागड तालुक्यात आजही मुलभूत सुविधा नाहीत
  • रस्ते व पुलांची बांधकामे संथगतीने
  • नदीवर ‘लाकडी पूल’ उभारला

भामरागड जिल्ह्याच्या दक्षिण भागातील शेवटचा टोक असलेल्या भामरागड तालुक्यात आजही मुलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. रस्ते व पुलांची बांधकामे होत असली, तरी त्यांची गती संथ आहे. त्यामुळे येथील नागरिक दरवर्षी पारंपरिक पद्धतीने आपल्या गावाकरिता सोयीसुविधा निर्माण करीत असतात. नक्षलग्रस्त लाहेरीजवळील चंगाडी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदान करीत गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर ‘लाकडी पूल’ उभारला. शासन, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दरवर्षी ग्रामवासी श्रमदानातून आवश्यक गरज लक्षात घेत लाकडी पूल उभारत आले आहेत.

Local Body Elections 2025: निवडणुकीचे बिगुल वाजले! सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा,१ नगरपंचायतीत उमेदवार आजमविणार नशीब

भामरागड तालुक्यातील लाहेरी अंतर्गत येणाऱ्या बंगाडी या गावात ४० घरांची वस्ती आहे. गंडेनूर ते बंगाडीदरम्यान वाहणाऱ्या नदीवर बेलीब्रीजचे काम सुरू आहे. सद्यःस्थितीत दोन्ही बाजूच्या पिल्लरचे बांधकाम झाले आहे. मात्र, मध्यभागातील काम झालेले नसल्याने नागरिकांना आवागमनासाठी नदीपात्रातून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात बंगाडी येथील नागरिकांना नदीतून जीव धोक्यात घालून नावेने प्रवास केल्याशिवाय पर्याय नसतो. परंतु, पावसाळा ओसरल्यानंतर नदीचा प्रवाह कमी होत असला, तरीसुद्धा नागरिकांना तालुका मुख्यालयासोबत लाखोरीला येण्यासाठी नावेचाच आधार घ्यावा लागतो. या समस्येवर स्थानिक नागरिकांनी आपल्या कल्पकतेच्या बळावर उपाय शोधला आहे. पावसाळा ओसरल्यानंतर येथील नागरिक एकत्र येत ‘लाकडी पूल’ बनविण्यासाठी श्रमदान करतात. परिसरातील जंगलात मिळणारे मजबूत वेल, बांबू, लाकडी फाटे यापासून पुलाची निर्मिती केली जाते. आता याच पुलावरून परिसरातील नागरिकांचे आवागमन होत आले आहे.

यावर्षी परिसरात चांगला पाऊस बरसल्यामुळे अजूनही नदीचा प्रवाह वेगवान आहे. त्यामुळे लाकडी पुलासाठी पिल्लर बनविणे अत्यंत कठीण होते. मात्र, नागरिकांनी आपल्या अनुभवाचा वापर करीत बांबूपासून गोलाकार पिल्लर बनवून त्यात मोठ्या प्रमाणात दगडे भरली. त्यामुळे पिल्लर उभे राहिले व पाच पिल्लरचा आधार घेत नागरिकांनी त्यावर मजबूत लाकडी फाटे वापरून ‘लाकडी पूल’ साकारला,

नागरिकांचा संघर्ष केव्हा संपणार?

या लाकडी पुलावरून ग्रामवासींचे शहर तसेच तालुका मुख्यालयात ये-जा सुरू आहे. शासन, प्रशासन विकासाच्या बाता मारत असले, तरी जमिनीवरील वास्तव स्थिती अधिक भयावह असल्याचे हे वास्तव उदाहरण आहे. त्यामुळे बंगहठीचासींचा हा संघर्ष केव्हा संपणार? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.

Mumbai Metro 7: गोरेगाव पूर्व स्टेशनला आता ‘झ्युरिक कोटक गोरेगाव पूर्व’ नाव

Web Title: Bangadi residents have to rely on a wooden bridge extreme neglect by the administration every year the bridge is built through voluntary labor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 07:18 PM

Topics:  

  • Gadchiroli
  • maharashtra

संबंधित बातम्या

रेशन दुकानदारावरील अन्याय कायम! ५ महिन्यांपासून कमिशन थकीत; दिवाळीही गेली अंधारात
1

रेशन दुकानदारावरील अन्याय कायम! ५ महिन्यांपासून कमिशन थकीत; दिवाळीही गेली अंधारात

Cabinet Meeting: गंभीर आजारांसाठी ‘या’ योजनेतून मिळणार 10 लाख रुपये…; मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय
2

Cabinet Meeting: गंभीर आजारांसाठी ‘या’ योजनेतून मिळणार 10 लाख रुपये…; मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय

Ramtek Film City : रामटेक फिल्मसिटीसाठी जागेचा प्रश्न सुटेना? दोन महिन्यांत होता हस्तांतरणाचा प्रयत्न
3

Ramtek Film City : रामटेक फिल्मसिटीसाठी जागेचा प्रश्न सुटेना? दोन महिन्यांत होता हस्तांतरणाचा प्रयत्न

BMC Elections : मोठी बातमी! महापालिकांचे बिगुल वाजण्याची शक्यता, निवडणूकीची तारीख होणार जाहीर
4

BMC Elections : मोठी बातमी! महापालिकांचे बिगुल वाजण्याची शक्यता, निवडणूकीची तारीख होणार जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.